पैलवानांना दिली जाणारी गदा खरंच चांदीची असते का?

जालना: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यातील बाला रफिक शेखने बाजी मारली. मातीचं मैदान गाजवणाऱ्या बाला रफिक शेखने अंतिम लढतीत मॅटचा सम्राट आणि गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेवर 11-3 अशी मात केली आणि मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या पैलवानाला मानाची गदा देण्यात येते. रोख रक्कम-पैशापेक्षा […]

पैलवानांना दिली जाणारी गदा खरंच चांदीची असते का?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

जालना: अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यातील बाला रफिक शेखने बाजी मारली. मातीचं मैदान गाजवणाऱ्या बाला रफिक शेखने अंतिम लढतीत मॅटचा सम्राट आणि गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेवर 11-3 अशी मात केली आणि मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.

महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या पैलवानाला मानाची गदा देण्यात येते. रोख रक्कम-पैशापेक्षा पैलवानासाठी ही गदा म्हणजे लाखमोलाचा ऐवज असतो. ही गदा नेमकी कशी असते? खरंच संपूर्ण गदा चांदीची असते का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचं 1982 मध्ये निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ गेल्या 36 वर्षांपासून मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र केसरी किताबविजेत्या पैलवानाला चांदीची गदा दिली जाते.

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरनार्थ देण्यात येणारी ही गदा कशी असते यावर एक नजर –

कशी असते महाराष्ट्र केसरीची गदा

उंची – साधारण 27 ते 30 इंच. व्यास – 9 ते 10 इंच.

वजन – 10 ते 12 किलो

अंतर्गत धातू – अंतर्गत सागवानी लाकूड आणि त्यावर अत्यंत कोरीव काम आणि आकर्षक पिळे

बाह्य धातू – 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्र्याने हुबेहूब कोरीव काम आणि झळाळी आणली जाते.

गदेच्या मध्यभागी स्व.मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवली असते. तर दुसऱ्या बाजूला हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवले असते.

त्यामुळे अतिशय मानाची समजली जाणारी ही गदा पटकावणार कोण हे महत्त्वाचं असतं. यंदा ही गदा सोलापूरच्या बाला रफिक शेखने पटकावली.

बाला रफिक शेखची बाजी

दरम्यान, जालना इथं रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2018 ची फायनल लढत पार पडली. यामध्ये करमाळ्याच्या बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजीत कटकेवर 11-3 गुणांनी मात करत, महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

संबंधित बातम्या 

‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी बाला रफिक शेख कोण आहे? जाणून घ्या  

बाला रफीक शेख यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ 

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.