Agriculture News : कोबीचा दर घसरल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हातात घेतला नांगर, मग…

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 06, 2023 | 9:11 AM

कोबीच्या शेतात शेतकऱ्यांनी चालविला नांगर! पालांदुरातील प्रकार, कोबीला अडीच रुपये किलोचा दर...

Agriculture News : कोबीचा दर घसरल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हातात घेतला नांगर, मग...
bhandara farmer
Image Credit source: tv9marathi

भंडारा – शेतात एखादं चांगलं पीक आलं की, त्याला बाजारात भाव मिळत नाही. त्याचबरोबर निसर्गाच्या (change of nature)अनियमित बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण चांगलं पीक आल्यानंतर त्याला मार्केटमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी (farmer) चिंतेत आले आहेत. एका शेतकऱ्याने (Agriculture News) तर चक्क अर्धा एकराच्या पत्ता कोबीच्या बागेवर नांगर चालविला आहे. उत्पादन खर्च ही निघत नसल्यामुळे हे कृत्य केल्याचं शेतकऱ्याने सांगितलं आहे.

भाजीपाल्यात पत्ता कोबीचे दर बाजारात मागच्या पंधरा दिवसांपासून घसरले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याचे कारण देत नैराश्यातून अर्धा एकराच्या पत्ता कोबीच्या बागेवर नांगर चालविल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ताकुक्यातील पालान्दूर येथे घड़ली आहे. पालांदूर येथील बागायतदार टीकाराम भुसारी यांनी दीड एकरात भाजीपाल्याची बाग सजवली आहे. त्यात भेंडी, फुलकोबी, पत्ताकोबी, कारले, वांगे अशा भाज्यांची लागवड केली आहे. यात अर्धा एकरात पत्ता कोबी लावली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून माल काढणीला आला आहे. मात्र, भावात तेजी दिसत नसल्याने नाईलाजाने उभ्या पिकात नांगर चालवावा लागला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI