गाईच्या शेणावर चालणार कार!; यांनी आणली ही नवीन टेक्नॉलॉजी

गोविंद हटवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 4:49 PM

भारतात बायोगॅसमुळं आर्थिक विकासात मदत होईल. यात ग्रामीण क्षेत्राचं मोठं योगदान राहील. यासाठी कंपनीने भारत सरकार आणि राष्ट्रीय डेअर विकास बोर्डासोबत एमओयू केलाय.

गाईच्या शेणावर चालणार कार!; यांनी आणली ही नवीन टेक्नॉलॉजी

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत (autocar) मोठी कंपनी मारुती सुझुकी आता एका नवीन टेक्नॉलॉजीवर (Technology) काम करत आहे. येणाऱ्या काळात कार पेट्रोल, डिझेल, बॅटरी किंवा सीएनजीवर नाही तर कार गाईच्या शेणावर चालणार आहे. कंपनीची प्लान असा आहे की, २०३० पर्यंत ६ नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या जातील. याशिवाय एका मोठ्या प्रकल्पावर ही कंपनी काम करत आहे. या प्रकल्पानुसार, गाईच्या शेणापासून कार चालविण्यास मदत केली होणार आहे.

वाढते प्रदूषण आणि किमतींसोबत लढण्यासाठी ही कंपनी या योजनेवर काम करत आहे. कंपनी बायोगॅसचा वापर करत आहे. या बायोगॅसची निर्मिती गाईच्या शेणापासून होईल. ग्रामीण भागात गाईंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळं बायोगॅस निर्मिती सहज केली जाऊ शकेल.

सीएनजीचा ७० टक्के भाग

एका अहवालानुसार, भारतीय कार बाजारात सीएनजीचा हिस्सा ७० टक्के आहे. अशात बायोगॅस सीएनजीला पर्याय म्हणून आणला गेल्यास याचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी गाईच्या शेणापासून बायोगॅस तयार करण्याच्या तंत्रज्ञानाला विकसित केले जात आहे.

मारुती सुजुकी बायोगॅससह येणाऱ्या काळात ऑफ्रिका, आशियान, जपान आणि आणखी काही देशात सुरू करणे तसेच निर्यात करण्याची योजना तयार केली जात आहे.

विकासात होईल मोठी मदत

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात बायोगॅसमुळं आर्थिक विकासात मदत होईल. यात ग्रामीण क्षेत्राचं मोठं योगदान राहील. यासाठी कंपनीने भारत सरकार आणि राष्ट्रीय डेअर विकास बोर्डासोबत एमओयू केलाय. तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कंपनीनं जपानमध्ये गाईच्या शेणापासून बायोगॅस बनविणाऱ्या वीज उत्पादन कंपनी फुजिसन असागिरी बायोगॅसमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासोबत मिळून तंत्रज्ञानावर काम करणं सुरू आहे.

देशात मोठ्या प्रमाणात गाई आहेत. या गाईंच्या शेणाचा वापर खत म्हणून केला जातो. पण, या खताचा वापर बायोगॅससाठी केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे. कंपनीलाही कमी खर्चात इंधन मिळेल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI