Agriculture News : तुरीच्या गंजीला आग लावल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान, दिवसाढवळ्या प्रकरण घडल्यामुळे…

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 06, 2023 | 8:31 AM

Agriculture News : दुपारी तुरीच्या गंजीला आग, शेतकऱ्यांची आग विझवण्यासाठी पळापळ,पण शेवट व्हायचा तोच झाला

Agriculture News : तुरीच्या गंजीला आग लावल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान, दिवसाढवळ्या प्रकरण घडल्यामुळे...
amravati farmer
Image Credit source: tv9marathi

सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur)तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर (Hingani Mirzapur) येथील शेतकरी भरत नवलकर यांनी आपल्या दहा एकर शेतामध्ये लाखो रुपये खर्च करून तुरीची लागवड केलेली होती. दोन-तीन दिवसांपासून तुरीची सोंगणी आता मशीनच्याद्वारे काढण्यासाठी शेतात एका ठिकाणी तुरीची गंज लावली.मात्र आज भरदिवसा एका अज्ञात इसमाने या शेतकऱ्याच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लावल्याने शेतकरी भरत नवलकर यांचे अंदाजे चार लाख रुपयांच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

आग लागल्याची माहिती गावात पसरतात गावातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीमध्ये तुरीची गंजी पूर्णतः जळून खाक झालेली होती . शेतकरी यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास आता दर्यापूर पोलीस करीत आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते, परंतु काल एका विकृत इसमाने केलेल्या कृत्यामुळे पोलिस सुद्धा चक्रावून गेले आहेत. पोलिस संबंधित इसमाचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांनी कालची घटना गांभीर्याने घेतली असून आपल्या पिकांची काळजी घेत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI