Amravati : संत्रा फळाला उन्हाची झळा, आंबिया बहर येताच फळगळ, अवकाळीनंतर वाढत्या उन्हाचा शेतकऱ्यांना ‘ताप’

Amravati : संत्रा फळाला उन्हाची झळा, आंबिया बहर येताच फळगळ, अवकाळीनंतर वाढत्या उन्हाचा शेतकऱ्यांना 'ताप'
वाढत्या उन्हामुळे फळगळतीचा धोका निर्माण झाला आहे.
Image Credit source: TV9 Marathi

संत्रा हे उन्हाळी हंगामातील मुख्य फळपीक आहे. असे असले तरी यंदा वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका संत्रालाच बसलेला आहे. आंबिया बहरातील या फळाची आतापर्यंत 3 ते 4 वेळा गळती झाली आहे. त्यामुळे संत्रा लागवड असलेल्या 10 तालुक्यात शेती शाळेत कृषि विभाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे.

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: राजेंद्र खराडे

May 13, 2022 | 10:50 AM

अमरावती: फळ लागवड होण्यापूर्वी  (Unseasonable Rain)अवकाळीच्या अवकृपेमुळे उत्पादनात घट झाली तर आता वाढत्या (Summer) उन्हामुळे लागलेली फळे जमिनीवर गळत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (Orchard) फळबागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. विदर्भाचा कैलिफोर्निया म्हणून समजल्या जाणारा अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील वरूड, मोर्शी, चाँदुर बाजार ,धामणगाव तालुक्यात संत्रा फळबागेचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. असे असताना मात्र, नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट झाली आहे. आंबिया बहर सुरु होताच वाढत्या उन्हामुळे सुरु झालेली फळगळ ही कायम आहे.

वाढत्या उन्हामुळे तीन टप्प्यात फळगळ

संत्रा हे उन्हाळी हंगामातील मुख्य फळपीक आहे. असे असले तरी यंदा वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका संत्रालाच बसलेला आहे. आंबिया बहरातील या फळाची आतापर्यंत 3 ते 4 वेळा गळती झाली आहे. त्यामुळे संत्रा लागवड असलेल्या 10 तालुक्यात शेती शाळेत कृषि विभाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळे पर्याय सांगितले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चान यांनी सांगितले आहे.

69 हजार हेक्टरावर संत्रा लागवड

विदर्भाचा कलिफोर्निया समजला जाणारा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी ,वरूड, चांदुर बाजार, धामणगाव भागातला संत्रा आता अडचणीत आला आहे.अमरावती जिल्ह्यात जवळपास 69 हजार हेक्टरवर संत्रा लागवड आहे. यापैकी 40 हजार हेक्टरवर आंबिया बहार आहे. यावर्षी आंबिया बहार गळून गेला आहे. काही संत्रा बागेत तर आंबिया बहार आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे .

उत्पादनापेक्षा खर्च अधिक

अमरावती जिल्ह्यात संत्रा हे मुख्य फळपिक आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिक खर्च होत आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारकडून मदत मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतू , फळबागायत शेतकऱ्यांकडे सातत्याने सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून अशाच संकटाचा सामना संत्रा उत्पादकांना करावा लागत आहे. अशीच परस्थिती राहिली तर संत्रा पीकच नष्ट होईल याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें