देशांतर्गत तांदळाच्या हंगामाला सुरुवात, ‘या’ दोन जातींच्या तांदळाला चांगली मागणी

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही तांदळांच्या किमती क्विंटलला 500 रुपयांनी वधारल्यात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:18 AM, 25 Jan 2021
देशांतर्गत तांदळाच्या हंगामाला सुरुवात, 'या' दोन जातींच्या तांदळाला चांगली मागणी

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, कोलम आणि आंबेमोहर तांदळाला चांगली मागणी असल्याचं चित्र समोर आलंय. देशातील सुरू झालेल्या तांदळाच्या हंगामातही यंदा आंबेमोहर आणि कोलम या नॉन बासमती तांदळाला बाजारपेठेत उठाव राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही तांदळांच्या किमती क्विंटलला 500 रुपयांनी वधारल्यात. आफ्रिका, युरोप, अमेरिका या देशांतून दोन्ही जातींच्या तांदळाला मोठी मागणी आहे. (Good Demand For Kolam, Ambemohar Rice At The Beginning Of The Rice Season)

सध्या जिथे भात पिकवला जातो, त्या पट्ट्यांत भातापासून तांदूळ काढण्याची प्रक्रिया वेगवान झालीय. अनेक भागांत मोठ्या प्रमाणात भातापासून तांदूळ काढला जात आहे. परदेशातील वाढती मागणी पाहता दोन्ही देशांतील तांदळाला चांगली मागणी आहे. दोन्ही जातींचे भाव वाढीव राहणार असल्याचाही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

1175 लाख टन उत्पादन वाढण्याची शक्यता

देशातील विविध राज्यांत यंदा तांदळाचे उत्पादन चांगले झालेय. विशेष म्हणजे या तांदळापासून 1175 लाख उत्पन्न येण्याचं कृषीतज्ज्ञांचं मत आहे. देशात यंदा 975 लाख हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आलीय. सध्या तांदळाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच निर्यातदारांनी आंबेमोहर आणि कोलम या दोन्ही जातींचे भात खरेदी करण्यावर जोर दिलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 रुपये क्विंटलने हे दर वाढलेत.

तांदळांच्या दरात 500 रुपयांची वाढ

मध्य प्रदेशात आंबेमोहर तांदळाला चांगली मागणी आहे. राज्यांतर्गत बाजारातही या तांदळाचा दर मोठा आहे. मध्य प्रदेशात क्विंटलला जागेवर 5500 ते 6000 रुपये दर होता. यंदा हा दर वाढून 6000 ते 6500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय. आंध प्रदेशात डिसेंबर 2019ला तोच दर क्विंटलला 6000 ते 6500 रुपयांच्या घरात होता. यंदा क्विंटलला 6500 ते 7000 रुपये दर मिळत आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात

संबंधित बातम्या

धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानचे बासमती तांदूळ मुस्लिम देशांना ‘नकली’ का वाटतात?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

Good Demand For Kolam, Ambemohar Rice At The Beginning Of The Rice Season