महाराष्ट्राचे मिनी काश्मीर स्ट्रॉबेरीसह “केशर” साठी सुद्धा ओळखले जाणार, कृषी विभागातर्फे केशर लागवडीचा पहिला प्रयोग

कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला अभिनव प्रयोग महाबळेश्वरमध्ये राबवण्यात येत आहे. Mahabaleshwar Keshar planting

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर स्ट्रॉबेरीसह केशर साठी सुद्धा ओळखले जाणार, कृषी विभागातर्फे केशर लागवडीचा पहिला प्रयोग
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 5:59 PM

सातारा: महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता स्ट्रॉबेरीच्या बरोबर “केशर” साठी सुद्धा ओळखले जाणार आहे. कृषी विभागातर्फे राज्यातील केशर लागवडीचा पहिला अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मिनी कशमीर म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. थंड हवेच्या ठिकाणामुळं आणि स्ट्रॉबेरीमुळे  महाबळेश्वर प्रसिद्ध आहे.  आता महाबळेश्वर आपली आणखी एक नवीन ओळख निर्माण करत आहे. ती म्हणजे महाबळेश्वरच्या थंड भूमीत आता केशरची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग कृषी विभागाच्या मार्फत सुरू आहे. (Mahabaleshwar Keshar planting)

काश्मीरची ओळख असलेल्या केशराची महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथे लागवड करण्यात येत आहे. केशर लागवड राज्याच्या कृषी विभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. ही लागवड यशस्वी झाल्यास या गिरिस्थळाची स्ट्रॉबेरीबरोबरच केशरसाठीही ओळख तयार होऊ शकेल. राज्यात प्रथमच केशर लागवड करण्यात येत आहे. (Mahabaleshwar Keshar planting)

महाबळेश्वरची ज्याप्रमाणं स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे तसेच ‘काश्मिरी केशर’ हा जगभरात उत्कृष्ट केशर म्हणून ओळखला जातो. या केशरचा भाव सरासरी साडेतीन लाख रुपये किलो असा आहे. काश्मीरमध्ये पंपोरे आणि किरतवाड या भागांमध्ये या केशराचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. केशराच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान, जमीन, प्रदेश उंची लागते. या उत्पादनासाठी लागणारे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरील असावे लागते. तेथील तापमान हे सरासरी १० डिग्री सेल्सियस असावे लागते. अशा ठिकाणी कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते.

काश्मीरहून मागवले कंद

महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्मीर येथील किरतवाड येथून कंद आणले आहेत. केशराचे हे कंद दोन हजार चारशे रुपये किलोप्रमाणे मिळतात. एक किलोमध्ये पस्तीस ते चाळीस कंद येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंद मागविण्यात आले आहेत. त्याचा खर्च कृषी साहाय्यकांनी स्वत:च्या खिशातून केला असून उत्पादन आल्यानंतर शेतकरी त्याची परतफेड करणार आहेत. (Mahabaleshwar Keshar planting)

केशरच्या लागवडीला महाबळेश्वर तालुक्यातील वातावरण आणि जमीन योग्य आहे. कृषी विभागानं काही शेतकऱ्यांच्या शेतात केशरची लागवड केलीय. केशरची लागवड ऑगस्टनंतर केली जाते. मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते. नावीन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्यात केशरची लागवड केलीय. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले पैसे मिळावे, म्हणून केशर लागवड केल्याची माहिती महाबळेश्वरचे कृषी सहायक दीपक बोर्डे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र कृषी विभाग महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना येथील वातावरणाचा फायदा घेऊन नावीन्यपूर्ण शेती प्रयोग राबवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. येथील हवामान, जमीन हे केशरसाठी चांगले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबर उत्पन्नाचा आणखी एक चांगला स्रोत उपलब्ध होणार आहे.(Mahabaleshwar Keshar planting)

संबंधित बातम्या :

रत्नागिरीतील शेतकऱ्याची कमाल, शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भात झोडणीच्या यंत्राची निर्मिती

वावरातून फेसबुक-व्हॉट्सअ‌ॅप, सीताफळाची थेट ऑर्डर, नांदेडच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

(Mahabaleshwar Keshar planting)

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.