Osmanabad : पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवल्याचा आरोप, चेक बाऊन्स झाल्यानंतर…

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 06, 2023 | 11:45 AM

अनेकदा शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना फसवणूक केली जाते. विशेष वजन काट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाची फसवणूक केली असल्याचं उजेडात आलं आहे. परंतु पोलिस अधिकाऱ्याने गोड बोलून फसवल्याने त्याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

Osmanabad : पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवल्याचा आरोप, चेक बाऊन्स झाल्यानंतर...
farmer usmanabad
Image Credit source: tv9marathi

उस्मानाबाद : जिल्ह्यात एका पोलिस अधिकाऱ्याने (Police officer) शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी (Farmer) संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात उस्मानाबाद पोलिस अधिक्षकांकडे (Osmanabad Superintendent of Police) तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने चेक देऊन माल खरेदी केला होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तक्रार दाखल्यानंतर पोलिस अधिक्षक काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केली, त्यावेळी शेतकऱ्यांना धमकावण्यात सुद्धा आलं आहे.

तुमच्या शेतीमालाला चांगला अधिकचा भाव देतो

इतर खरेदी केंद्रापेक्षा तुमच्या शेतीमालाला चांगला अधिकचा भाव देतो असं सांगत एका पोलीस अधिकाऱ्याने उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या प्रकरणी रुईभर, बरमगाव, गावसुद यासह इतर गावातील शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

33 शेतकऱ्यांची फसवणूक

मागील दीड वर्षापूर्वी नानासाहेब भोसले या पोलीस अधिकाऱ्याने रूईभर येथील 33 शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल खरेदी करून तब्बल पन्नास लाख रुपये बुडवल्याचा आरोप केला आहे. शेतमाल खरेदी करण्यापूर्वी कारनामा करून शेतमाल विक्री करण्यात आला होता. तसेच चेकही देण्यात आले होते, मात्र हे चेक बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांनी पैश्यांची मागणी केली, असता त्यांनाच धमकवण्यात आल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

अनेकदा शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना फसवणूक केली जाते. विशेष वजन काट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाची फसवणूक केली असल्याचं उजेडात आलं आहे. परंतु पोलिस अधिकाऱ्याने गोड बोलून फसवल्याने त्याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI