PM Kisan Samman | भाजपशासित आसाममध्ये फक्त ‘7 टक्के’ लाभार्थ्यांना मिळाला सातवा हप्ता, कारण काय?

महाराष्ट्रात 91 टक्के तर आसाममध्ये 7 टक्के लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाले आहेत. (PM Kisan Samman Yojana)

PM Kisan Samman | भाजपशासित आसाममध्ये फक्त '7 टक्के' लाभार्थ्यांना मिळाला सातवा हप्ता, कारण काय?
PM Kisan Samman Nidhi
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 1:39 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान( PM Kisan Samman Yojana) योजनेचा सातवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी जारी केला. सातव्या हप्त्याची 2 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. किसान सन्मान योजनेचा सातवा हप्ता 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. शिवसेनेची सत्ता असणाऱ्या महाराष्ट्रात 91 टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. तर, जेडीयूची सत्ता असणाऱ्या बिहारमध्ये 94 टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचली. मात्र, भाजपशासित आसामामध्ये केवळ 7 टक्के शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.(PM Kisan Samman Yojana Seven percentage farmers of Assam get seventh installment)

आसामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत घट

आसामध्ये पहिल्या हप्त्याच्यावेळी 31 लाख 20 हजार 346 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 27 लाख 18 हजार 605 शेतकऱ्यांना पैसे मिळाले. दुसऱ्या हप्त्यावेळी 24 लाख 26 हजार 485 शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळाले. तर, तिसऱ्या हप्त्यावेली 20 लाख 60 हजार 469 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले. आसामच्या 19 लाख 2 हजार 222 शेतकऱ्यांना चौथा हप्त्याचा लाभ मिळाला, तर पाचव्या हप्त्यावेळी 8 लाख 50 हजार 072 इतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला.

सहावा हप्ता मिळाला नाही

आसाममधील शेतकऱ्यांना 6 व्या हप्त्यातील रक्कम मिळाली नव्हती.तर, सातव्या हप्त्यातील रक्कम फक्त 7 टक्के लाभार्थ्यांना मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये गैरव्यवहार झाला असून 7 लाख लोकांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रातील 91 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्यातील रक्कम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याही खात्यात जमा झाली आहे. राज्यातील 1 कोटी 13 लाख 24 हजार 927 शेतकऱ्यांना एकूण 1 कोटी 2 लाख 51 हजार 613 रुपये मिळाले आहेत. तर भाजपशासित आसामध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे. तिथे केवळ 7 टक्के लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम मिळाली.

सातवा हप्ता 31 मार्चपर्यंत मिळणार

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 हजार रुपये टाकले जातात. प्रत्येक हप्त्याला 2000 रुपये याप्रमाणे ही रक्कम वितरित करण्यात येते. यानंतर पुढचा हप्ता 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. संबंधित राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची माहिती पुरवली जाईल, तशी ही रक्कम त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. मागील 6 दिवसांमध्ये मोदी सरकारने आणखी 6,22,969 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये टाकले आहेत. सरकारच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरक असणाऱ्या साधनांची खरेदी करण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या:

किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता जारी, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

PM Kisan Yojna : अद्याप 7.5 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले नाहीत, पैसे हवे असल्यास करा हे काम

(PM Kisan Samman Yojana Seven percentage farmers of Assam get seventh installment)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.