सांगली जिल्ह्यात पाझर तलाव फुटला, विहिरी मुजल्या, शेतीचं मोठं नुकसान

जोरदार पावसामुळं तलावातील पाणी पातळीत वाढ झाल्यानं तलाव फुटला.  तलावातून वाहून गेलेल्या पाण्यामुळे ओढया लगतच्या विहिरी मुजल्या.

सांगली जिल्ह्यात पाझर तलाव फुटला, विहिरी मुजल्या, शेतीचं मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 2:51 PM

सांगली – आटपाडी तालुक्यातील मिटकी गावात असणारा पाझर तलाव फुटला आहे. जोरदार पावसामुळं तलावातील पाणी पातळीत वाढ झाल्यानं तलाव फुटला.  तलावातून वाहून गेलेल्या पाण्यामुळे ओढया लगतच्या विहिरी मुजल्या. शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. चुकीच्या बाजूला सांडवा काढल्याने मिटकीचा पाझर तलाव वाहून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (water project burst in mitki village of Sangli district  )

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी  भागात  झालेल्या जोरदार पावसामुळे आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा पाझर तलाव वाहून गेला आहे. या तलावात टेंभू योजनेचे पाणी येते. अचानक पाऊस पडल्याने तलावात पाणी भरपूर आल्याने तलाव फुटला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले आहे.

मिटकी तलावाचा सांडवा चुकीच्या पद्धतीने काढला आहे. त्यामुळे तलावातील पाणी सांडव्यातून बाहेर पडले नाही, सांडव्यातून पाणी बाहेर न पडल्यामुळे तलाव फुटला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. तलावाचा सांडवा दक्षिण बाजूने काढला आहे तो चुकीचा आहे तो सांडवा उत्तर बाजूने असता तर त्यावरुन व्यवस्थित पाणी वाहून गेले असते, असा दावा शेतकऱ्यांनी केला.

आटपाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं मिटकी गावच्या पाझर तलावात पाणी  वाढले आणि तलाव फुटला. यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकासानाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं जिल्हा परिषद ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितले. मिटकी तलावाच्या दुरुस्ती लवकरच केली जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या: 

सुरेश धस सांगलीत, पडळकरांच्या साथीने ऊसतोड मजुरप्रश्नी आक्रमक, साखरपट्ट्यात आंदोलन

Sangli Rain | सांगली | आटपाडीत मुसळधार पाऊस, दुचाकी चालक वाहून जातानाचा व्हिडीओ समोर

(water project burst in mitki village of Sangli district  )

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.