बुलढाण्यात काल झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीनजणांचा मृत्यू झाला. त्यात मायलेकींचा समावेश आहे. तर या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
संबारे कुटुंबीयांच्या घरची लग्नाची वरात अशा काही प्रकारे निघेल याचा काही अंदाज गावातील लोकांना नव्हता. नेहमी प्रमाणे गावकरी लग्नासाठी जमले होते. पोर आणि पोरी लग्नात फुलटू डान्स करण्याच्या तयारीत होते.
पुण्याहून मेहकरकडे एसटी चालली होती. मात्र निश्चित स्थळी पोहचण्याआधीच वाटेत घात झाला. वाटेत कंटेनर आडवा आला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
बुलढाण्याचा युवा तिरंदाज प्रथमेश जावकर हा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. प्रथमेशने बुलढाणा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होतेय.
बुलढाणा आणि वाशिममध्ये काल दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण पाचजण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
बुलढाण्यातील एक आगळंवेगळं लग्न चर्चेत आलं आहे. एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह दणक्यात पार पडला. या विवाह सोहळ्यात जनावरांच्या अन्न पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
आनंदसागर आध्यात्मिक केंद्राचा काही भाग आहे त्या स्थितीत सुरू करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय विश्वस्थांनी कळवले आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन केलं आहे. नऊ महिन्यांपासून पाटील बुलढाण्यात फिरकलेच नसल्याने येथील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
बुलढाण्यात भेंडवळची घट मांडणी करण्यात आली आहे. या घट मांडणीतून राजकीय भाकीत वर्तवण्यात आलं आहे. राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील. पण राजा तणावात असेल असं भाकीत या घट मांडणीतून वर्तवण्यात आलं आहे.
बुलढाणा येथे भेंडवळची घट मांडणी झाली आहे. यंदा पेरण्या उशिरा होणार असून राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता या घट मांडणीतून वर्तवण्यात आली आहे. मात्र, यंदा पीक जोरात येणार असल्याचं भाकीतही वर्तवण्यात आलं आहे.