Vinayak Raut : शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि राजन विचारे यांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शेवाळे यांच्यावर टीका केली. राहुल शेवाळे यांना आता अक्कलदाढ यायला लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी चार वाजता दिल्लीकडे रवाना होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्नेहभोजनाचा समारंभ सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे फडणवीस भाजपच्या पक्ष श्रेष्ठींची भेट घेतील आणि त्यात मंत्रिमंडळाच्या लीस्टवर फायनल हात फिरवला जाईल, अशी शक्य�
काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली. साधारण 12 वाजता सोनिया गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाल्या. जवळपास अडीच तास त्यांची ईडी चौकशी चालली.
Vinayak Raut : 6 जुलै 2022 रोजी शिंदे यांच्या गटाची संसदेत स्थापनाही झाली नव्हती. अधिवेशनही सुरू नव्हतं. त्यावेळी आम्ही पत्रं दिलं होतं. भावना गवळी यांच्या ऐवजी राजन विचारे यांना मुख्य प्रतोद करण्याचं पत्र दिलं होतं. लोकसभा कार्यालयाने दुपारी ते स्वीकारलं.
Shiv Sena : या पत्रात शिंदे गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती दिली आहे. तसेच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून मुख्य नेते हे नवे पद निर्माण करण्यात आल्याची माहितीही या याचिकेत देण्यात आली आहे.
माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रामदास कदम यांच्या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
नवी दिल्लीः सत्तेची, आमदारकीची भांग प्यायलेले शिवसेना भवनच काय, मातोश्रीवरही (Matoshri) कब्जा सांगतील. पण शिवसेना (Shivsena) एवढ्या सहजा सहजी शरण जाणारी नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार फोडल्यानंतर आता शिवसेनेतील 12 खासदारही शिंदेंच्या गटात शामिल होणार असल्याचं वृत्त आहे. �
Sanjay Raut : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ कायदेशीर आहे नाही तो नंतरचा भाग.
'बेकायदेशीरपणे घेतलेले निर्णय दिसत नाहीत. राज्यात जो रोष निर्माण झाला आहे, तो दिसत नाही. त्यांनी दरवाजे खिडक्या अशाप्रकारे बंद केल्या आहेत की बाहेर जो आक्रोश सुरू आहे त्याची तिरीप सुद्धा त्यांना दिसत नाही,'अशी टीका संजय राऊतांनी केलीय.
दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी किमान 12 मंत्र्यांची गरज आहे, असा दावा संजय राऊत यांनी यापूर्वी केला आहे. संजय राऊत एवढ्यावरच न थांबता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी ही मागणी देखील करताना दिसत आहेत.