सरकारी कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीचं गिफ्ट; खास सवलतीसह आवडती कार खरेदीची संधी

उत्सवाच्या हंगामात मारुती सुझुकी इंडिया आपल्या सर्व वाहनांवर चांगल्या ऑफर्स देत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीचं गिफ्ट; खास सवलतीसह आवडती कार खरेदीची संधी

मुंबईः आपण सरकारी कर्मचारी आहात आणि कार घेण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने सर्व सरकारी कर्मचार्‍यांना मोठं गिफ्ट दिलं असून, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व मारुती कारवर 11,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. (maruti suzuki unveils special discount )

उत्सवाच्या हंगामात मारुती सुझुकी इंडिया आपल्या सर्व वाहनांवर चांगल्या ऑफर्स देत आहे. परंतु आता कंपनी सरकारी कर्मचार्‍यांना आणखी एक मोठा धक्का देणार आहे, ज्यात ते सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष सवलत मिळवू शकतात आणि सर्व गाड्यांमध्ये 11,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळवू शकतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या लीव्ह ट्रॅव्हल कन्सिशन (LTC) ला चालना देण्यासाठी कॅश व्हाऊचर योजनेनंतर कंपनीने ही ऑफर दिली आहे.

सर्व प्रकारचे सरकारी कर्मचारी घेऊ शकतात लाभ

कंपनीने म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, केंद्र सरकार, राज्य सरकार, पॅरा मिलिटरी यांच्यासह सर्व सरकारी कर्मचारी आणि संबंधित पती-पत्नी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. मारुतीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर सूट भिन्न असेल.

अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न

मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक (Marketing & Sales) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, सुस्तावलेल्या अर्थव्यवस्था गती देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करीत आहे. अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणे आणि त्यास वाढण्यास मदत करणे आपले कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांमध्ये सुमारे 10 दशलक्ष कर्मचारी काम करत आहेत आणि मारुती सुझुकीसाठी ग्राहकांचा हा एक मोठा भाग आहे. आम्ही सरकारी कर्मचार्‍यांसाठी एक खास पॅकेज जाहीर केले आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीची गाडी घरी नेणं शक्य होणार आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

Festival Offer : दसरा, दिवाळीत Jeep Compass वर 1.5 लाखांची सूट

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *