Video: आली रे आली… हवेत उडणारी बाईक आली; ताशी 100 किलोमीटरचा स्पीड

उडणाऱ्या कार नंतर आता जगात आता फ्लाइंग बाईक्सची निर्मिती होत आहे. ही बाईक दिसालया एखाद्या मोठ्या आकाराच्या ड्रोनसारखी आहे.

Video: आली रे आली... हवेत उडणारी बाईक आली; ताशी 100 किलोमीटरचा स्पीड
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 11:48 PM

न्यूयॉर्क : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे वाहन चालक परेशान होतात. मात्र, या ट्रॅफीकच्या कटकटीतुन सुटका होणार आहे. कारण आता थेट हवेत उडणारी बाईक(flying bike ) आली आहे. ‘एरविन्स एक्सटुरिस्मो’ अमेरिकेतील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये हवेत उडणाऱ्या बाईकची झलक पहायला मिळाली आहे.

उडणाऱ्या कार नंतर आता जगात आता फ्लाइंग बाईक्सची निर्मिती होत आहे. ही बाईक दिसालया एखाद्या मोठ्या आकाराच्या ड्रोनसारखी आहे.

हाय टेक्नॉलीजी आणि सेन्सर्सने ही बाईक बनवलेली आहे. ‘एरविन्स एक्सटुरिस्मो’ अमेरिकेतील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये ही बाईक ठेवण्यात आली.

जपानची स्टार्टअप कंपनी एरविन्स टेक्नॉलॉजीने ही हॉवरबाईक बनवली आहे. ही बाइक पेट्रोलवर चालते. ताशी 100 किलोमीटरच्या स्पीडने ही बाईक उडते. 80 ते 100 किमी प्रतितास अशी या बाईकची वेग मर्यादा आहे.

ही बाईक एकावेळी 30 ते 40 मिनिटे हवेत उडवू शकता येवू शकते. रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन स्टँडर्ट रंगात ही बाईक उपलब्ध आहे. या बाईकचे वजन 300 किलो आहे. हवेत उडताना ही बाईक 100 किलो वजन पेलवू शकते. या हॉवरबाईकला कावासाकी हायब्रिड इंजिन आहे.

बाईक हवेत उडताना प्रचंड आवाज करते. यामुळे या बाईकला नॉइज रिड्यूसर जोडले जाणार आहेत. या बाईकची किंमत 7,77,000 डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे 6 कोटी 20 लाख 32 हजार 183 रुपये इतकी होते.

भविष्यात ही उडणारी बाईक आणखी स्वस्त होईल असा दावा कंपनीच्या सीईओंनी केला आहे. 2023 पासून हॉवरबाईकचे छोटे व्हर्जन यूएसमध्ये विकले जाणार आहे. यानंतर बाईकच्या यशस्वी विक्रीनंतर, लहान आणि स्वस्त व्हर्जनची विक्री 2025 पासून भारत, चीन आणि जगातील इतर देशांमध्ये सुरू केली जाणार आहे.

ऑक्टोबर 2021 मध्येच कंपनीने जपानमधील प्रदर्शनादरम्यान बाइकचे मॉडेल डिजिटली लाँच केले होते. काही महिन्यांनंतर बाईकचा डेमोही दाखवण्यात आला होता.

एका चिनी व्यक्तीने ऑक्टोबर 2019 च्या सुमारास त्याच्या घरी फ्लाइंग बाईकची निर्मिती केली. यानंतर त्याने याची यशस्वी चाचणी देखील करुन दाखवली. याचा व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.