लवकरच धमाल करायला येते आहे ओलाची इलेक्ट्रिक कार, फ्युचरिस्टिक डिझाईन पाहून खूश व्हाल

या येणाऱ्या कारचे इतर स्पेशिफिकेशन्स आणि फइचर्स याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले आहे की १५ ऑगस्टला याबाबतची अधिक माहिती देण्यात येईल.

लवकरच धमाल करायला येते आहे ओलाची इलेक्ट्रिक कार, फ्युचरिस्टिक डिझाईन पाहून खूश व्हाल
electric carImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 11:07 PM

नवी दिल्लीः भारताच्या इलेक्टिरक स्कूटरच्या मार्केटमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता OLA Electricने एका नव्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) सेगमेंटमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. 19 जून रोजी ओला कस्चटमर डेच्या निमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांना तामिळनाडूतील कंपनीच्या अपकमिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बोलवले होते. या कार्यक्रमात कपनीचे सीईओ भाविष अग्रवाल यांनी अपकमिंग ओला इलेक्र्टिक कारचे टिझर (Teaser) जारी केले. या 30 सेकंदांच्या टीझरमध्ये एकाहून जास्त इलेक्ट्रिक कार दिसत आहेत. जाणून घेऊयात ओला इलेक्ट्रिक कारच्या फ्युचर्सबाबत

3 इलेक्ट्रिक कार एकदम येण्याची शक्यता

ओला कारने जो टिझर प्रसिद्धीला दिला आहे, त्यात तीन कार दिसत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधाराने, ईव्ही स्टार्टअप कंपनीसोबत एक हॅचबॅक, सिडान आणि एसयूव्ही इलेक्ट्रिक कारवर ओला कंपनी काम करीत आहे. ओला सिडानचा लूक एरोडायनामिक आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये असा लूक मिळणे फारच अवघड आहे. टीझरमध्ये गाडीचे रुबाबदार पुढे डिझाईन, एलईडी लायटिंग असे शानदार फिचर्स दिसत आहेत.

15 ऑगस्टला पुढची घोषणा होण्याची शक्यता

या येणाऱ्या कारचे इतर स्पेशिफिकेशन्स आणि फइचर्स याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले आहे की १५ ऑगस्टला याबाबतची अधिक माहिती देण्यात येईल. या नव्या इलेक्ट्रिक कार्सना स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात येऊ शकते. या ओला कारची संभाव्य किंमत एक्स शोरुम १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.

संभाव्य रेंज

या अपकमिंग इलेक्ट्रिक कारची बॅटरीची क्षमता किती असेल असा प्रश्न ्नेकांना पडलेला असेल. या कारचे फ्युचरिस्टिक डिझाईन पाहता ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देणाऱअया बॅटरीचा वापर यात होऊ शकतो, अशी शक्यता आहे. याचा अर्थ असा की ओला इलेक्ट्रिक कारमध्ये ६०-८० केड्ब्ल्यूएच लिथियम ऑयन बॅटरी पॅकचा वापर केला जाऊ शकतो. मात्र हॅचबॅक, सिडान आणि एसयूव्हीसाठी वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स असतील.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.