Diwali 2022: दिवाळीत इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे? ही बँक देत आहे व्याजात सूट

यंदाच्या दिवाळीत कार खरेदी करायची आहे आणि ती देखील इलेक्ट्रिक कार तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक बँका EV खरेदीला प्रोत्साहित करण्यासाठी व्याजदरात सूट देत आहेत.

Diwali 2022: दिवाळीत इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे? ही बँक देत आहे व्याजात सूट
इलेकट्रीक कार Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 1:28 PM

मुंबई, देशात सणासुदीचे वातावरण आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळी (Diwali 2022) हा सण काही दिवसांनी साजरा होणार आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीला अनेक जण नव्या वाहनांची खरेदी करतात. भारतातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सरकार लोकांना अधिकाधिक इलेक्ट्रिक कार (Car Loan For EV)  खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. लोकांना या सणासुदीच्या हंगामात ईव्ही कार खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना  कर्जाच्या व्याजदरावर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि ॲक्सिस बँक यांसारख्या अनेक बँकांच्या नावांचा समावेश आहे.

करदात्यांना मिळणार करात सूट

इलेक्ट्रिक कार खरेदीदारांना कर्जाच्या व्याजदरात सूट देण्यासोबतच सरकार अतिरिक्त कर सूटही देत ​​आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा फायदा होणार आहे. करमुक्तीमुळे अनेकांना त्यांची पेट्रोल-डिझेल कार इलेक्ट्रिक कारमध्ये अपग्रेड करायची आहे. एकीकडे ग्राहकांना कर्ज आणि व्याजदरात सवलत मिळत आहे, तर दुसरीकडे महागडे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यापासून मुक्ती मिळाल्याने लोकांसाठी ईव्ही कार दीर्घकाळासाठी खूप किफायतशीर ठरणार आहे. यासह, नेहमीच्या पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत ईव्ही कारच्या देखभालीसाठी म्हणजेच मेंटेनन्ससाठी कमी खर्च लागतो.

हे सुद्धा वाचा

जाणून घेऊया बँकेकडून व्याजात किती सूट मिळत आहे

बँका त्यांच्या ग्राहकांना इलेक्ट्रिक कारवर 10 ते 30 बेसिस पॉइंट्सची सूट देत आहेत. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक कारवरील कार कर्जावर अतिरिक्त 0.25 टक्के सूट देत आहे. त्याच वेळी, स्टेट बँक ऑफ इंडियाने EV कार खरेदीसाठी SBI ग्रीन कार लोन ऑफर आणली आहे. यासाठी ग्राहकांना कार लोनवर 0.20 टक्के सूट मिळत आहे.

बँक ग्राहकांना 7.95  ते 8.30 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तुम्ही SBI कडून ग्रीन कारचे कर्ज घेतल्यास, ते 3 ते 8 वर्षांच्या दरम्यान परतफेड करू शकता. त्याच वेळी, ॲक्सिस बँक ग्राहकांना कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 वर्षांची मुदत देते. दुसरीकडे, बहुतांश बँका त्यांच्या ग्राहकांकडून EV कार कर्जावर कोणतेही प्रीपेमेंट आकारत नाहीत. दुसरीकडे, बँकांनी ग्राहकांकडून अशा कर्जासाठी 0.2 टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.