प्रत्येक गाडीत असले पाहिजे हे पाच आरामदायी फिचर्स; खराब रस्त्यांवरही लुटाल प्रवासाचा आनंद

कमी पैशात जास्त हायटेक वैशिष्ट्ये मिळविणे हे यामागील मुख्य कारण आहे. अशा स्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच 5 वैशिष्ट्ये घेऊन आलो आहोत, जी वैशिष्ट्ये तुमच्या गाडीत असतील, तर तुम्ही आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. (Each car must have five comfortable features; Enjoy the Lutal journey even on bad roads)

प्रत्येक गाडीत असले पाहिजे हे पाच आरामदायी फिचर्स; खराब रस्त्यांवरही लुटाल प्रवासाचा आनंद
प्रत्येक गाडीत असले पाहिजे हे पाच आरामदायी फिचर्स
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 8:44 AM

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोनाचा पहिल्यांदा फटका बसला, त्या काळात सर्वच क्षेत्रे डगमगली. अनेक क्षेत्रांत अनलॉकनंतरच्या तीन-चार महिन्यांतही सावरता आलेले नाही. त्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे विविध क्षेत्रांची कोलमडलेली घडी जैसे थे राहिली आहे. वाहन क्षेत्र मात्र यात अपवादात्मक होते. अनलॉकनंतर लगेचच काही दिवसांत वाहन क्षेत्राने पूर्वीचा वेग पकडला होता. कारण, आपल्या देशात वाहनप्रेमींची कमी नाही. भारतात वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत आजकाल अशी हायटेक वाहने येत आहेत, ज्यात ग्राहकांच्या सोईसाठी अनेक जबरदस्त वैशिष्ट्ये दिली जात आहेत. (Each car must have five comfortable features; Enjoy the Lutal journey even on bad roads)

म्हणजेच, जर तुम्ही लांब प्रवासात गेलात तर ही वैशिष्ट्ये तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. कार कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीपासून मोठ्यापर्यंत वाहने बाजारात आणत आहेत. त्यामुळेच ग्राहकांनी हॅचबॅकपेक्षा मोठ्या मोटारी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. कमी पैशात जास्त हायटेक वैशिष्ट्ये मिळविणे हे यामागील मुख्य कारण आहे. अशा स्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच 5 वैशिष्ट्ये घेऊन आलो आहोत, जी वैशिष्ट्ये तुमच्या गाडीत असतील, तर तुम्ही आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

अ‍ॅडजस्टेबल सीट्स

कंपनी आपल्या मर्जीनुसार गाडीमध्ये सीट्सची व्यवस्था अर्थात डिझाईन करते. परंतु, आपल्या सोईनुसार सीट्स अ‍ॅडजस्ट करण्याची व्यवस्था अनेक गाड्यांमध्ये केलेली असते. जर आपली उंची लहान किंवा मोठी असेल तर आपण फक्त एका बटणाच्या मदतीने या सीट्स इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्ट करू शकतो. जर तुम्ही तुमच्या मित्राला तुमची कार चालवायला दिली असेल तर तो मित्रदेखील सुलभतेने सीट्स अ‍ॅडजस्ट करून ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकतो.

कूलिंग सीट्स

बऱ्याच वेळा आपल्या गाड्यांच्या सीट्स अशा मटेरियलपासून बनवलेल्या असतात की उन्हाळ्यात त्या सीट्सवर बसण्याचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण गाडीतील एसी चालू करून उन्हात तापलेल्या सीट्स थंड करतो, परंतु तरीही आपल्याला समस्या जाणवते. म्हणून आजकाल प्रत्येक कार कंपनी ‘कूलिंग सीट्स’ देत आहे. म्हणजेच आपल्या सीटखाली एक पंखा लावलेला असतो, तो पंखा आपली सीट थंड ठेवतो. लांब प्रवासासाठी हे एक आरामदायी वैशिष्ट्य आहे.

क्रूझ कंट्रोल

जेव्हा आपण लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघतो, त्यावेळी आपण महामार्गावर वाहनाचा वेग निश्चित करतो आणि गाडी चालवितो, दरम्यान, आपल्या कारमध्ये जर क्रूझ कंट्रोल असेल तर ते आपला प्रवास अधिक चांगला आणि आरामदायी करते. म्हणजेच, जर तुम्ही त्याच वेगाने सरळ जात असाल तर क्रूझ कंट्रोल चालू करून कार एका वेगात सेट करू शकता. तुम्ही एक्स्लेटरआणि गीयरशिवाय वाहन ऑटोमॅटिक मोडवर सोडू शकता. यामुळे आपली कार त्याच वेगाने धावेल.

स्टीयरिंग माऊंटेड फोन आणि ऑडिओ कंट्रोल

आजच्या वाहनांमध्ये कोणत्याही ग्राहकांना मॅन्युअल बटणे नको असतात. ग्राहकांना आपल्या मर्जीनुसार सर्व काही व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजेच, मध्यभागी असलेल्या बटणाव्यतिरिक्त आपल्या कारच्या स्टीयरिंगवर प्रत्येक बटण पाहिजे असते. जेणेकरून आपण न हलता सर्व कार्ये नियंत्रित करू शकतो. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरते.

रियर डिफॉगर आणि वायपर

वाहनाच्या पुढच्या विंडशील्डवर आपल्याला वायपर आणि बाकीची वैशिष्ट्ये मिळतात, परंतु मागील काचेसाठी आपल्याला सर्व काही हाताने करावे लागते. म्हणूनच आपल्या कारच्या मागील बाजूस वायपर असले पाहिजेत. जेणेकरुन तुम्ही गाडी चालवताना वेळोवेळी काच स्वच्छ ठेवू शकता व त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवता येते. तसेच धुक्यादरम्यान डिफॉगर उपयुक्त ठरते. जेणेकरून समोरून येणाऱ्या गाड्या स्पष्टपणे दिसतील व कोणताही संभाव्य अपघात टाळता येऊ शकेल. (Each car must have five comfortable features; Enjoy the Lutal journey even on bad roads)

इतर बातम्या

Viral Video: मानवी वस्तीमध्ये शिरला महाकाय सरडा, व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

PHOTO | Investment | या योजना बचतीसाठी आहेत उत्तम, तुम्हाला मिळेल दुप्पट फायदा, करात सूटही मिळेल!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.