‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्या वापरत आहात? पहा किती सहपणे होऊ शकते चोरी

तुम्ही देखील ह्युंदाई आणि किया कंपनीपैकी ही कार वापरात असाल तर तुमच्यासाठी हि महत्त्वाची बातमी आहे. या कार इतर कारच्या तुलनेत अधिक चोरीला जात असल्याचे समोर आले आहे.

'या' दोन कंपन्यांच्या गाड्या वापरत आहात? पहा किती सहपणे होऊ शकते चोरी
कार चोरी
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 24, 2022 | 6:24 PM

मुंबई, भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई आणि किया कारला मोठी मागणी आहे. नवीन कर खरेदी करणारे ग्राहक या दोन  कंपन्यांना अधिक पसंती देत असल्याचेदेखील समोर आले आहे.  दक्षिण कोरियाच्या दोन्ही ऑटो कंपन्यांनी देशातील कार बाजारात चांगली पकड बनवली आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos  मॉडेल्स भारतात कमी कालावधीत खूप लोकप्रिय झाली आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या एका अहवालात दोन्ही कंपन्यांच्या कारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या अहवालानुसार, ह्युंदाई आणि कियाच्या कार चोरांसाठी सर्वात सोप्या असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊया नेमके काय कारण आहे की, ज्यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत Hyundai आणि Kia च्या कार सहजपणे चोरीला जाऊ शकतात.

2015-2019 मॉडेलमधील दोष

इन्शुरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी (IIIHS) च्या मते, Hyundai आणि Kia कारच्या चोरीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे कारमध्ये इमोबिलायझर नसणे. IIIHS च्या संशोधनानुसार, 2015 ते 2019 दरम्यान बनवलेल्या Hyundai आणि Kia च्या कार मॉडेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक इमोबिलायझर नाही.

ह्युंदाई-किया आहे सॉफ्ट टार्गेट

हायवे लॉस डेटा इन्स्टिट्यूटच्या  अहवालात असे आढळून आले आहे की, Hyundai आणि Kia शिवाय immobilizer च्या  कार चोरीचा दर वर्षाकाठी प्रति 1,000 विमाधारकांमागे  2.28% आहे. इतर कंपन्यांमध्ये, हा दर प्रति 1,000 वाहन विमाधारकांमध्ये  1.21% आहे.

1990 पासून काही वाहनांमध्ये  चिप-सुसज्ज चाव्या सुरू करण्यात आल्या. ही चिप दुसर्‍या चिपशी जोडलेली नसते तेव्हा कार सुरू होत नाही. त्यामुळेच कोणत्याही चोरट्याला गाडीचे इंजिन सुरू करणे इतके सोपे नसते. तथापि, Kia Rio आणि Sportage व्यतिरिक्त, Hyundai Accent सारख्या मॉडेल्समध्ये इमोबिलायझर प्रणाली नाही.

2015 मध्ये, इतर कार कंपन्यांच्या 96 टक्के कारमध्ये इमोबिलायझर मानक होते. तर Hyundai आणि Kia च्या बाबतीत फक्त 26 टक्के गाड्यांना इमोबिलायझर देण्यात आले होते. मात्र, दोन्ही कार कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये इमोबिलायझर न वापरण्याचे कारण दिलेले नाही.

काही व्हायरल व्हिडीओमध्‍ये चोरांनी किआ आणि ह्युंदाईच्‍या गाड्या कशा चोरल्‍या हे देखील दाखविले आहे. HT Auto च्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओंमध्ये चोर Hyundai आणि Kia वाहनांचे इग्निशन कव्हर काढताना दिसत आहेत, त्यानंतर कार सुरू करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर किंवा USB केबल वापरताना दिसत आहेत.

2022 मॉडेल सादर केल्यानंतर, Kia ने आपल्या वाहनांमध्ये इमोबिलायझर्स प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ह्युंदाईचे म्हणणे आहे की 1 नोव्हेंबर 2021 नंतर उत्पादित सर्व वाहनांनी मानक म्हणून इमोबिलायझर वापरण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें