Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hyundai India ची प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 ही कार आज भारतात लाँच करण्यात आली आहे.

Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 12:53 PM

मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hyundai India ची प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 (all new i20) ही कार आज लाँच करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबरपासून या कारच्या बुकींगला सुरुवात करण्यात आली आहे. 21 हजार रुपये टोकन अमाऊंट भरून तुम्ही ही कार बुक करु शकता. (Hyundai Motor India launched all new i20, Check price and features)

Click To Buy प्लॅटफॉर्मद्वारे नवीन i20 कार बुक करणाऱ्या HDFC आणि ICICI या बँकांच्या ग्राहकांना बुकिंग अमाऊंटवर 10 टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ एस. एस. किम म्हणाले की, i20 हा ह्युंदाई कंपनीसाठी सुपर परफॉर्मर ब्रँड ठरला आहे. ही कार गेल्या एक दशकापासून आधुनिक भारतीय ग्राहकांच्या पसंतील उतरत आहे. ऑल न्यू आय 20 प्रिमियम कारने हॅचबॅक सेगमेंटमध्ये शानदार स्टाईल आणि नव्या उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे एक बेन्चमार्क सेट करुन ठेवला आहे.

ही कार पेट्रोल, डिझेल, टर्बो पेट्रोल बीएस-6 इंजिन आणि ट्रान्समिशनसह सज्ज आहे. ज्यामध्ये फर्स्ट इन-सेगमेंट इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आईएमटी), इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आईवीटी), 7-स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आणि मॅन्युअल व्हेरिएंटचा समावेश आहे.

all new i20 कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.79 लाख रुपये ते 11.17 लाख रुपयांमध्ये आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपयांपासून ते 10.59 लाख रुपयांपर्यंत आहे. या या किंमती 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे.

नवीन i20 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. ज्यामध्ये 83hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल किंवा CVT गियरबॉक्सचा पर्याय आहे. डिझेल इंजिन 1.5 लीटर टर्बो यूनिट आहे जे 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क निर्माण करु शकतं. डिझेल इंजिनासह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा आहे. या कारचे इंजिन Venue, Creta, 2020 Verna आणि Seltos या कारमध्ये यापूर्वी वापरण्यात आले आहे.

व्हिडीओ पाहा

नवीन i20 च्या फ्रंटमध्ये मोठे ग्रिल, शार्प हेडलॅम्प आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल दिले आहेत. रुफलाईन आणि शार्प स्टाईलचा सी-पिलरमुळे कारचा लूक अप्रतिम वाटतो. तर नवीन i20 च्या मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेललाईट आहे.

कंपनीने या कारबाबत म्हटलं आहे की, ऑल-न्यू आय-20 ही कार ‘लाइट वेट प्लेटफॉर्म’वर बनवण्यात आली आहे. ही कार वजनाने हलकी आहे. ही कार 66 टक्के ‘अॅडव्हान्स्ड अँड हाय स्ट्रेंथ स्टील’द्वारे बनवण्यात आली आहे. ही कार ग्राहकांना पूर्ण सुरक्षा देण्यास सक्षम आहे. या कारचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे.

संबंधित बातम्या

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

Swift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट लाँच

PHOTO : दिवाळीपूर्वी होंडाच्या कारवर 2.5 लाखांची सूट

आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार

(Hyundai Motor India launched all new i20, Check price and features)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.