कार टेस्टिंगसाठी भारत होणार ‘ग्लोबल हब’, सरकारनं घेतला मोठा निर्णय

राकेश ठाकूर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 05, 2023 | 7:28 PM

केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय ऑटो कंपन्यांच्या पथ्यावर पडणार आहे. यापूर्वी सरकारकडून 252 टक्के कस्टम ड्युटी घेतली जात होती. मात्र आता यासाठी एक रुपयाही मोजण्याची गरजन नाही.

कार टेस्टिंगसाठी भारत होणार 'ग्लोबल हब', सरकारनं घेतला मोठा निर्णय
कार टेस्टिंगसाठी भारत होणार 'ग्लोबल हब', सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुंबई: जगभरात रस्ते अपघातांची संख्या पाहता सुरक्षित असलेल्या गाड्यांची मागणी वाढली आहे. ग्राहकही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गाड्यांना प्राधान्य देतात. असं असताना इंपोर्टेड गाड्यांची सुरक्षा चाचणी देशात घेण्यासाठी आता भारत सरकारनं दारं खुली केली आहेत. यापूर्वी इंपोर्टेड गाड्यांवर घेतली जाणारी 252 टक्के कस्टम ड्यूटी रद्द केली आहे. या निर्णयामुळे देशात इंपोर्टेड गाड्यांना टेस्टिंग करणं सोपं होणार आहे. इतकंच काय ग्लोबल हब बनण्यास मदत देखील होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये झिरो कस्टम ड्युटीबाबत घोषणा केली होती. हा निर्णय 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. यापूर्वी इंपोर्टेड गाड्यासाठी 252 टक्के कस्टम ड्युटी लागत होती. एएनआयच्या रिपोर्टनुसार, भारत कार सेफ्टी टेस्टिंग बिझनेसमध्ये आता जागतिक स्तरावर स्पर्धा करेल. यापूर्वी कस्टम ड्युटी पाहता कंपन्या धजावत नव्हत्या. मात्र आता कस्टम ड्युटी झिरो केल्याने कंपन्यांना मोकळीक मिळाली आहे.

अवजड उद्योग मंत्रालयाने काय सांगितलं?

अवजड उद्योग मंत्रालयाने सांगितलं की, यापूर्वी इंपोर्टेड गाड्यांवर कस्टम ड्युटी खूप जास्त होती. गाड्यांच्या किंमतीच्या 252 टक्के कस्टम ड्युटी घ्यावी लागत होती. यामध्ये बेसिक इंपोर्ट ड्युटी, माल आणि विमा शुल्क यांचा समावेश होता. इतक्या मोठ्या कर आकारणीमुळे ग्लोबल बिझनेस आणि सर्व्हिस टेस्टिंग एजेंसी स्पर्धेतून बाहेर पडत होत्या. याचा परिणाम टेस्टिंग उद्योगावर पडत होता.

कार टेस्टिंगमध्ये भारताचा सहावा क्रमांक

जगातील पाच देशांकडेच आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड कार सेफ्टी सुविधा आहे. युनाइटेड किंगडम, जर्मनी, जापान, चीन आणि तैवान या देशाचा यात समावेश आहे. या देशांमध्ये कार टेस्टिंग सुविधा आहे. आता ग्लोबल कार टेस्टिंग सेंटरसाठी भारत जगातील सहावा देश बनला आहे.

काय असते सुरक्षा चाचणी?

जगभरातील कोणतीही कार कंपनी नव्या कारची निर्मिती करते तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने चाचणी घ्यावी लागते. ग्लोबल एनसीएपीसारख्या काही संस्था याबाबतची चाचणी घेतात. गाड्याची सर्व प्रकारे सुरक्षा चाचणी घेतली जाते. त्यानंतर गाड्यांना सुरक्षा स्टार दिले जातात. 5 स्टार मिळालेली गाडी सर्वात सुरक्षित मानली जाते. असं असलं तरी लक्झरी कार बनवणाऱ्या रोल्स रॉयस गाड्यांची सुरक्षा चाचणी घेतली जात नाही. कारण या गाडीची किंमत 5 कोटींपासून सुरु होते. सुरक्षा चाचणीसाठी 4 ते 5 गाड्यांची आवश्यकता असते. संस्थाना गाडी विकत घेऊन चाचणी घ्यावी लागते. त्यामुळे विकत घेऊन टेस्ट करणं कठीण आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI