मोठी बातमी! नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करताय; मग ‘हा’ नियम लवकरच बदलणार

या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेणाऱ्या समितीची शिफारस स्वीकारल्यास ही व्यवस्था लागू होऊ शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:43 AM, 25 Jan 2021
मोठी बातमी! नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करताय; मग 'हा' नियम लवकरच बदलणार

नवी दिल्लीः नवीन वाहन खरेदी (New Vehicle) करणार्‍यांना वाहनाची किंमत आणि विम्याचा प्रीमियम (Insurance Premium) यासाठी वेगवेगळे धनादेश द्यावे लागू शकतात. जर विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) मोटर विमा सेवा प्रदाता (MISP) या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेणाऱ्या समितीची शिफारस स्वीकारल्यास ही व्यवस्था लागू होऊ शकते. (IRDAI Panel For Separate Payments Of Vehicle And Insurance Premium)

IRDAI ने या प्रक्रियेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी 2017 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तसेच वाहन व्यापाऱ्यांनी दिलेला वाहन विमा हा विमा अधिनियम 1938 च्या तरतुदीखाली आणणे हादेखील त्यामागील उद्देश होता. MISP विमा कंपनीद्वारे नियुक्त केलेल्या वाहन विक्रेत्यांना किंवा विमा मध्यस्थ युनिटसाठी हा नियम आहे, जे विक्री केलेल्या वाहनांसाठी विमा सेवा देखील प्रदान करतात.

2019 मध्ये समिती स्थापन केली गेली

2019 मध्ये नियामकाने एमआयएसपी मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती गठीत केली. एमआयएसपीमार्फत मोटार विमा व्यवसायाच्या कामकाजासाठी समितीने आपल्या अहवालात अनेक शिफारसी केल्यात. समितीने मोटार वाहन विमा पॉलिसी बनवताना ग्राहकांकडून प्रीमियम पेमेंट घेण्याच्या सद्य पद्धतीचा आढावा घेतला.

विमा हप्त्यांच्या दरांत पारदर्शकतेचा अभाव

समितीने म्हटले आहे की, सध्याच्या प्रणालीमध्ये ग्राहकांनी प्रथमच वाहन विक्रेत्याकडून वाहन खरेदी केल्यास विमा प्रीमियम भरण्याच्या किमतीबद्दल पारदर्शकतेचा अभाव आहे. यामध्ये ग्राहकांकडून एकाच धनादेशाद्वारे पेमेंट केले जाते. एमआयएसपी त्यांचे हे खाते विमा कंपनीकडे हस्तांतरित करते, अशा परिस्थितीत ग्राहकाला हे माहीत नसते की त्यांनी भरलेला विमा प्रीमियम किती आहे, कारण त्यात वाहनच्या किमतीचा समावेश असतो. समितीने म्हटले आहे की, पारदर्शकतेचा अभाव पॉलिसीधारकाच्या हिताचा नसतो, कारण ग्राहकांना विम्याची खरी किंमत माहीत नसते. तसेच ग्राहकांना कव्हरेज पर्याय आणि सवलती इत्यादीविषयी माहिती मिळत नाही.

संबंधित बातम्या

2021 च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी कार्सचा धडाका, Mercedes, BMW, Skoda च्या शानदार कार्स लाँच

Okinawa Scooter | स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लायसन्सचीही गरज लागणार नाही, किंमत फक्त…

IRDAI Panel For Separate Payments Of Vehicle And Insurance Premium