Tata Motors Altroz : लाँचपूर्वीच फोटो लीक, पाहा कशी असेल टाटाची अल्ट्रोझ

Tata Motors लवकरच भारतीय बाजारात त्यांची प्रिमिअम हॅचबॅक Altroz आणण्याच्या तयारीत आहे (Tata Motors Altroz). कंपनीने मोठ्या प्रमाणावर या कारची टेस्टिंग सुरु केली आहे. Tata Altroz च्या टेस्टिंगदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत.

Tata Motors Altroz : लाँचपूर्वीच फोटो लीक, पाहा कशी असेल टाटाची अल्ट्रोझ
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 1:56 PM

मुंबई : Tata Motors लवकरच भारतीय बाजारात त्यांची प्रिमिअम हॅचबॅक Altroz आणण्याच्या तयारीत आहे (Tata Motors Altroz). कंपनीने मोठ्या प्रमाणावर या कारची टेस्टिंग सुरु केली आहे. Tata Altroz च्या टेस्टिंगदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत (Altroz Photo Leak). यामध्ये या गाडीचं एक्सटेरिअर दिसत आहे. आता या प्रिमिअम कारच्या इंटिरिअरचे फोटोही ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून Tata Altroz च्या कॅबिनमधील अनेक डिटेल्स समोर आल्या आहेत.

Tata Motors Altroz

Tata Altroz चं इंटिरिअर हे ड्युअल-टोन कलरमध्ये असणार आहे. त्याशिवाय यामध्ये निळ्या रंगाची एम्बिएंट लाईटिंगही असेल. कारमध्ये फ्रंट सेंटर आर्मरेस्ट आणि क्रोम डोअर हँडल देण्यात आलं आहे. तसेच, Altroz मध्ये फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 3-स्पोक मल्टी-फंक्शन स्टेअरिंग व्हील यांसाख्या सुविधा असणार आहेत. कारचं इंस्ट्रूमेंट क्लस्टर हे हॅरिअर एसयूव्हीसारखं दिसत आहे. याच्या उजव्या बाजुला अॅनालॉग स्पीडोमीटर आणि डाव्या बाजुला डिजीटल स्क्रिन आहे.

Tata Motors Altroz

इंजिन

Tata Altroz मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनचे दोन ऑप्शन दिले जाऊ शकतात. यामध्ये एक इंजिन टर्बोचार्ज्ड युनिट असेल. ज्या व्हेरिअंटच्या इंटिरिअरचे फोटो लीक झाले आहेत, त्या व्हेरिएंटमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स असू शकतात. त्याशिवाय, यामध्ये 1.5-लीटर डिझल इंजिनचंही ऑप्शन असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला ही गाडी ऑटोमॅटिक गियरबॉक्समध्ये उपलब्ध नसेल. मात्र, नंतर कंपनी Tata Altroz चा ऑटोमॅटिक व्हेरिअंट आणेल.

किंमत

Tata Altroz अल्फा प्लॅटफॉर्मवर आधारित टाटा मोटर्सची पहिली गाडी असेल. बाजारात या गाडीची Maruti Suzuki Baleno, Hyundai Elite i20 आणि Honda Jazz यांसारख्या प्रिमिअम हॅचबॅक गाड्यांशी स्पर्धा असेल. Tata Altroz ची किंमत 6 लाख रुपयांच्या जवळपास असेल.

संबंधित बातम्या :

Honda च्या गाड्यांवर 4 लाखांपर्यंत भरघोस सूट

स्पोर्टी लूक, पावरफुल इंजिन, Hyundai ची नवी i10 N Line

Tata Nexon चं लिमिटेड एडिशन मॉडेल Kraz लाँच, किंमत तब्बल…

नवीन Maruti Brezza लवकरच लाँच होणार, पाहा खास फीचर्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.