सर्वाधिक मागणी असलेली Tata ची कार महागली, जाणून घ्या नव्या किंमती

टाटाची सर्वाधिक विकली जाणारी सब-कॉम्पॅक्ट कार SUV Nexon महाग झाली आहे. कंपनीने या कारची किंमत वाढवली आहे. रशलेनने आपल्या अहवालात किंमतीबाबत अपडेट्स दिले आहेत.

सर्वाधिक मागणी असलेली Tata ची कार महागली, जाणून घ्या नव्या किंमती
Tata Nexon

मुंबई : टाटाची सर्वाधिक विकली जाणारी सब-कॉम्पॅक्ट कार SUV Nexon महाग झाली आहे. कंपनीने या कारची किंमत वाढवली आहे. रशलेनने आपल्या अहवालात किंमतीबाबत अपडेट्स दिले आहेत. रिपोर्टनुसार, कंपनीने Nexon च्या किमती 11,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. कंपनीने डिझेल व्हेरियंटमध्ये 11,000 रुपयांची आणि पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 10,500 रुपयांची वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीने नेक्सॉनच्या किमतीत वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे. (Tata Nexon prices hiked by up to Rs 11000, 5 Diesel Variants Discontinued)

नेक्सॉनच्या किमतीत वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 7.30 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, किमतीत वाढ झाल्यानंतर, Nexon – XZA+(O) Dark या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 13,23,900 रुपयांवरून 13,34,900 रुपयांवर गेली आहे. कंपनीने Nexon चे बरेच व्हेरियंट महाग केले आहेत, पण तरीही काही वेरिएंट आहेत, ज्यांच्या किंमतीत यावेळी बदल करण्यात आलेला नाही.

काही व्हेरिएंट्स बंद करण्याचा निर्णय

कंपनीने Nexon चे काही डिझेल व्हेरिएंटदेखील बंद केले आहेत, ज्यात XZ आणि XZA+(S) व्यतिरिक्त एंट्री-लेव्हल XE, मिड-स्पेक XMA आणि XMA(S) यांचा समावेश आहे. नेक्सॉनच्या वाढलेल्या किमती आणि अपडेटेड व्हेरियंट कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झाले आहेत.

Tata Nexon एसयूव्हीमध्ये काय आहे खास?

टाटा नेक्सॉनचं डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला सनरूफ, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत, जे ऑटो ट्रांसमिशनसह येतात. Tata Nexon मध्ये 120hp पॉवर आणि 170Nm साठी 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर 1.5-लीटर डिझेल इंजिन 110hp आणि 260Nm सह बनवण्यात आलं आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅनुअल किंवा एएमटीसह उपलब्ध आहे. नेक्सॉनची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 6.99 लाख रुपये इतकी आहे.

दरम्यान, टाटाची ही छोटी क्रॉसओव्हर गाडी भारतातील पहिली अशी कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांची प्रत्येक कार मजबूत कशी होईल, याकडे सर्वाधिक लक्ष देते. तसेच टाटाच्या टियागो आणि टिगॉरला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

कशी आहे टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही?

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Tata Nexon prices hiked by up to Rs 11000, 5 Diesel Variants Discontinued)

Published On - 6:07 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI