रेनॉच्या BS4 कारवर 2 लाखांचा डिस्काऊंट

फ्रान्सची कार निर्माती कंपनी रेनॉचे (Renault) अनेक मॉडेल्स भारतातील मार्केटमध्ये उपलब्ध (Discount on renault car) आहेत. रेनॉ क्विड (Renault Kwid) भारतात प्रसिद्ध आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:19 PM, 13 Mar 2020
रेनॉच्या BS4 कारवर 2 लाखांचा डिस्काऊंट

मुंबई : फ्रान्सची कार निर्माती कंपनी रेनॉचे (Renault) अनेक मॉडेल्स भारतातील मार्केटमध्ये उपलब्ध (Discount on renault car) आहेत. रेनॉ क्विड (Renault Kwid) भारतात प्रसिद्ध आहे. भारतात BS6 एमिशन नॉर्म्सही लवकरच लागू होणार आहेत. 1 एप्रिल 2020 पासून भारतात नवीन एमिशन नॉर्म्स लागू केले जाणार आहेत. याचा अर्थ भारतात 31 मार्च 2020 नंतर BS4 वाहनांचे रिजिस्ट्रेशन आणि सेल बंद होणार आहे. त्यामुळे रेनॉ आपल्या BS4 कार डिस्काऊंट (Discount on renault car) ऑफरमध्ये विकत आहेत.

रेनॉ ट्रायबरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट

ही भारतातील सर्वात स्वस्त MPV पैकी एक आहे. या कारवर कंपनी 10 हजार रुपयांचा लॉयल्टी डिस्काऊंट आणि 5 हजार रुपयांची कॅश डिस्काऊंट देत आहे.

रेनॉ क्विडवर 64 हजार रुपयांचा डिस्काउंट

ही कार भारतात मारुतीच्या एस-प्रेसो कारला टक्कर देते. क्विड के प्री-फेसलिफ्ट BS4 व्हर्जनवर 50 हजार रुपयांची कॅश डिस्काऊंट, 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 10 हजार रुपयांची लॉयल्टी डिस्काऊंट दिली जात आहे.

रेनॉ कैप्चरवर 2 लाख रुपयांचा डिस्काऊंट

रेनॉ कैप्चर ही कार कंपनीची प्रीमिअम लुकिंग SUV आहे. या कारवर 2 लाख रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. कारच्या BS4 व्हर्जनवर 20 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे आणि 10 हजार रुपयांचे रुरल कस्टमर बेनिफिटही दिले जात आहे.

रेनॉ डस्टरवर 2 लाख रुपयांचा डिस्काउंट

रेनॉच्या या पॉप्युलर कारवर 2 लाख रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 20 हजार रुपयांचा लॉयल्टी डिस्काऊंटही मिळत आहे.