राम मंदिर तर होणारच, उद्धव ठाकरे अयोध्येत कडाडले

राम मंदिर हा माझ्यासाठी निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता, राम मंदिराबाबत लवकरात लवकर कायदा व्हावा आणि राम मंदिर बनावं हीच आमची इच्छा आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत म्हणाले.

राम मंदिर तर होणारच, उद्धव ठाकरे अयोध्येत कडाडले

मुंबई/लखनऊ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (16 जून) अयोध्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नवनिर्वाचित 18 खासदारांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांपूर्वीही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांसह अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिराबाबत आपली भूमिका ठाम आहे. राम मंदिर हे बनणारच, असं स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत दिली होती. मात्र, त्यानंतर शिवसेना-भाजप युती झाली आणि उद्धव ठाकरे कदाचित ती घोषणाच विसरले की काय असं वाटत होतं. लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीने घवघवीत यशही मिळवलं. त्यानंतर आपण अयोध्येचा मुद्दा विसरलेलो नाही हेच सांगण्यासाठी उद्धव ठाकरे आज पुन्हा अयोध्या दौऱ्यावर होते.

राम मंदिर बनणारच : उद्धव ठाकरे

अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याचा उद्धेश स्पष्ट केला. अनेकांना वाटलं होतं की मी अयोध्या दौरा हा केवळ निवडणुकांसाठी केला होता आणि त्यानंतर मी ते विसरलो. मात्र, असं नव्हत. राम मंदिर बनणार म्हणजे बनणार, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

राम मंदिर हा आपल्यासाठी  निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता, राम मंदिराबाबत लवकरात लवकर प्रस्ताव पारित व्हावा आणि राम मंदिर बनावं हीच आमची इच्छा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही स्तुतीसुमनं उधळली. मोदींमध्ये हिंमत आहे, लवकरात लवकर राम मंदिर होणार. आम्ही सगळे मिळून राम मंदिर बांधणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुखांनी अयोध्येत दिली. राम मंदिर तर होणारच, राम मंदिर ही लोकांच्या मनातली भावना आहे तो काही निवडणुकीचा विषय नाही. त्यासाठी हिंदूंनी एकत्र राहायला हवं, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

LIVE UPDATE

Picture

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपली, थोड्याच वेळात मुंबईसाठी निघणार

16/06/2019,11:52AM
Picture

अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरु

16/06/2019,11:50AM
Picture

16/06/2019,11:49AM
Picture

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब आणि 18 खासदारांसह अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं, शरयू नदीच्या तीरावर जाऊन आरतीही करणार

16/06/2019,10:47AM
Picture

 उद्धव ठाकरे थोड्याच वेळात अयोध्येत दाखल होणार, अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

16/06/2019,10:22AM
Picture

उद्धव ठाकरे फैजाबादच्या पंचशील हॉटेलमधून अयोध्येच्या दिशेने रवाना, लवकरच रामजन्मभूमीचे दर्शन घेणार

16/06/2019,10:01AM
Picture

उद्धव ठाकरे पंचशील हॉटेलमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी हॉटेलबाहेर स्थानिक नेत्यांची गर्दी

16/06/2019,9:34AM
Picture

उद्धव ठारेंचा ताफा पंचशील हॉटेलकडे रवाना, हॉटेलमध्ये काहीवेळ आराम करुन पुढे रामललांचं दर्शन घेण्यासाठी जाणार

16/06/2019,9:34AM
Picture

उद्धव ठाकरेंचं विमान फैजाबाद विमानतळावर दाखल, काहीच वेळात ठाकरे कुटुंबीय विमानतळाच्या बाहेर पडणार

16/06/2019,9:37AM
Picture

काहीच वेळात उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह फैजाबाद विमानतळावर पोहोचतील

16/06/2019,9:34AM
Picture

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सकाळी 6.30 वाजता अयोध्येसाठी मातोश्रीहून रवाना

16/06/2019,9:34AM

संबंधित बातम्या :

शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!

एका राज्यमंत्रिपदासाठी शिवसेनेत ‘या’ चार आमदारांची जोरदार लॉबिंग

महाराष्ट्र तुझी वाट पाहतोय : राऊतांच्या आदित्यला शुभेच्छा

शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसणार, YSR काँग्रेसला लोकसभेचं उपाध्यक्षपद?

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *