BLOG : ‘उंबरठा’ ओलांडलेले आभाळ

मराठी मातीच्या संस्कारातून नाट्यधर्माची पताका घेऊन कलेच्या वारीला निघालेला हा कलावंत आपल्यामागे लक्षलक्ष प्रेक्षकांना आणि कलावंतानाही त्याच पायवाटेवरुन मागूते व्हा म्हणत आज दूरच्या प्रवासाला निघालाय.. अलविदा हयवदन..

BLOG : 'उंबरठा' ओलांडलेले आभाळ
Follow us
| Updated on: Jun 10, 2019 | 12:55 PM

ऋषी श्रीकांत देसाई, टीव्ही 9 मराठी

महाराष्ट्र.. कलावंताची खाण आणि कलेचं माहेरघर.. इथल्या मातीचा कण नि कण शोध घेत असतो दुरवरच्या त्या क्षितिजाचा.. आणि मातीचा वारसा खेळतो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या नसानसातून.. महाराष्ट्राचा इतिहास संपन्न केलाय तो याच मातीच्या भूगोलानं.. असंच एक महाराष्ट्रातलं गाव म्हणजे माथेरान.. थंड हवेचे ठिकाण म्हणून विश्वविख्यात असलेल्या या गावातला १९ मे १९३८ ला एक वादळ जन्माला आलं.. शाळकरी वयात पठारावरुन द-यांमध्ये आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी शोधताना तो आवाज डोगरपल्याड अगदी सिमापल्याड गेला.. आणि सामाजिक स्थित्यंतराच्या आणि मानवी कल्लोळाला त्या वादळाचा जणू आधार मिळाला.. मेंदूच्या कल्लोळाला आणि बेभान झालेल्या सामाजिक वेगाला आवर घातला तो याच वादळानं.. आणि त्या वादळाचं नाव होतं.. गिरीश रघुनाथ कर्नाड…

तो सुमार १९४० चा होता.. स्वांतत्र्याचे धुमारे फुटत होते आणि त्याचवेळी मराठी नाटकाच्या सुवर्णपर्वाला ही आरंभ झाला होता. माथेरानमधून विद्यानगरी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या कर्नाडांच्या आयुष्यात त्याच वेळी मराठी नाटकांची श्रीमंती आली.. लहानपणीच बालगंधर्व आणि किर्लोस्करांसारख्या नाटकमंडळीची नाटक पाहत भरजरी झालेल्या कार्नाडांना नंतर याच फुटलाईटच्या प्रकाशात भारतीय नाटक आपल्याला वास्तवात आणायचं आहे याची त्यावेळी कदाचित कल्पनाही नसेल.. मुळच्या कोकणी कुटूंबातील या तरुणाला मराठीने वेड लावलं खरं, पण तोपर्यंत कर्नाटकात जावं लागलं. कर्नाटकातल्या सिरसीमध्ये शिक्षण घेत असतानाच नाटकवेड्या परिवाराच्या संस्कारामुळे कर्नांडानी यक्षगान प्रकारासाठी तोंडाला रंग फासला आणि त्याचवेळी नभातल्या तारांगणालाही हेवा वाटेल असे एक दैदिप्यमान नक्षत्र रंगमंचावर अवतरलं. लोकसंस्कृतीचा हाच घट्ट वसा आणि वारसा आजही गिरीश कर्नाड यांच्या लिखाणातून दिग्दर्शनातून आणि अभिनयातूनही समर्थपणे दिसतो.   धारवाड विद्यापीठातून मॅथ्येमेटीक्स आणि स्टॅटीक्सच्या या विद्यार्थी असणा-या कार्नांडानी लिंकन क़ॉलेज ऑक्सफर्ड गाठलं आणि पॉलिटिक्स, फिलॉसॉफीमध्ये पारगंत झाले. त्य़ानंतर शिकागो विद्यापीठात प्राध्यापकी करत विद्यार्थ्यांवर संस्कारही केले.

पण नाटक आणि कलेची बाधा ज्याला झाली ना कि, त्याच ‘माणूसपण’ खेचत राहतं त्याला, एक असीम अशा प्रकाशाकडे.. त्याच प्रकाशात प्रत्येकाला आपल्यातल्या ख-या कलावंताचा शोध लागतो. आणि सुरु होतो कलावंताचा स्वताशीच संघर्ष…

तो काळ सत्तरचा होता. ऑक्सफर्ड युनिवर्सीटीतल्या नोकरीचा राजीनामा देत कर्नाडांनी चेन्नईत आता स्थानिक ऐम्युचर थिएटरसाठी काम करायचं ठरवलं..

कार्नांडानी रंगभुमीसाठी काम करायचं ठरवल.. पण त्यांच्यातला अभिनेता आणि लेखक यांच्यात व्दंव्द झाल.. कर्नांडानी लेखक म्हणून मातृभाषा कोकणी स्विकारली नाही की, ज्या भाषेत विचारांना गती मिळाली ती इंग्रजी स्विकारली नाही.. त्यानी स्विकारली ती कानडी भाषा.. कार्नांडानी कन्नडमध्ये लिखाणास सुरुवात केली त्या काळी तात्कालीन कन्नड लेखकांवर आणि कन्नड साहित्यावर पाश्चिमात्यांचा प्रभाव होता. कार्नांडानी प्रवाहाच्या विरुद्ध झोकून द्यायचे ठरवले आणि त्यांच्या मदतीला धावुन आली ती यक्षगानची पात्रसंस्कृती.. वयाच्या २३व्या वर्षी कार्नांडानी सामाजिक बदलांना नाट्यपरावर्तीत करायचं ठरवल आणि त्यासाठी एतिहासिक पात्र आणि मिथकांचा वापर करत त्यांनी कन्नड रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर जावून ठेवल..  महाभारतातल्या असंख्य पात्रांपैकी एक असलेला ययाती, कार्नांडाच्या लेखणीतून साकारला आणि कन्नड रंगभूमीनं त्याला सम्राटपद दिलच.. आणि या सार्वभौमानं अनुवादीत होत मराठीसह इतर भाषांमध्ये उतरत रसिक मनांवर अधिराज्य केलं.. आणि ते आजही चिरतरुण आहे ययातीच्या तारुण्याएवढच…

तत्कालीन सामाजिक माणसांची घुसमट आणि इतिहासाची सांगड हे सगळ काहीतर वेगळच होत.. पण तो पर्यत वयाच्या २७ व्या वर्षी गिरीश कर्नांडानी, जी व्यक्तीरेखा कुंचल्यातून साकारण कठीण ती आपल्या लेखणीनं लिलया रेखाटली. कर्नांडांचे तुघलक रंगभूमीवर आलं आणि प्रयोगणिक या तुघलकांनं रसिकाची काळीजं अक्षरक्ष लुटली… इब्राहिम अल्काझी आणि दिनेश ठाकूर या कलावंतानी तुघलकाला दिल्लीत एनएसडीत पुन्हा सत्ताधिश बनवलं..

मस्तक बदलांच्या खेळाला कार्नाडांनी नाव दिलं हयवदन.. आणि यक्षगानशी प्रेरणा घेऊन आलेला हा प्रकार विजया मेहता नावाच्या अनुभवसंपन्न दिग्दर्शिकेच्या हाती लागला आणि प्रयोगागणिक भारतीय रंगभूमी समृद्ध होत गेली. डेत्सेचेस च्या रंगपीठावरही हयवदनचा प्रयोग तेवढ्याच ताकदीन स्विकारला गेला हे विशेष..  हयवदन पाठोपाठ नागमंडलनेही खळबळ माजवून दिली. आणि त्य़ाच नागमंडलचा विळखा मराठीतही तेवढ्य़ाच ताकदीन बसला गेलाय..

कन्नडमध्येही अग्नि मत्ते मळे, ओदकलु बिम्ब, अंजुमल्लिगे, मा निषाद, टिप्पुविन कनसुगळू या नाटकांच्या गारुडांनी मोहीत झालेला आजही फार मोठा प्रेक्षकवर्ग आहे हे .. कन्नड आणि मराठीत अनमोल अशी नाट्यसंपदा उधळणा-या या कलंदर कलावंताच्या हाती रुपेरी पडदा मिळाला.. आणि मग चंदेरी संपत्तीला लाभलं हि-याचे कोंदण..

रंगभूमीच्या तिन भिंतीत आपलं लिलया साम्राज्य उभ्या करणा-या गिरीश कार्नांडानी भारतीय चित्रपट सृष्टीलाही तेवढ्याच ताकदीन सजवलय..  मराठीत निशांत उंबरठा ही दोन नावच त्यांना समजून घ्यायला खूप मोठी आहेत. यु.आर अनंतमुर्तीच्या कांदबरीवर आधारीत १९७०च्या संस्कार या चित्रपटासाठी कर्नांडानी पटकथा लेखन केल. आणि या चित्रपटानं कन्नड सिनेसृष्टीतला पहिलं राष्ट्रपती पुरस्काराचं सुवर्णकमळ पटकावलं.. गिरीश कार्नांडानी १९७१ मध्ये एस एल भैरप्पा यांच्या कांदबरीवर पहिल्यांदाच वंशवृक्ष हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटासाठी कर्नाडांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर भारतीय रजतपटावर कर्नांडानी आपल्या अदाकारीन आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९७७ चा गोधुली, १९८४ चा उत्सव आणि उंबरठा या सारखे चित्रपट कुणी विसरुच शकत नाही. उत्कृष्ट दिग्दर्शक असणा-या कार्नांडाना अभिनेता म्हणून संधी मिळाली तीही सत्यजीत रे, मृणाल सेन  आणि श्याम बेनेगल याच्यासारख्या विख्यात दिग्दर्शनात काम करण्याची.. नाटक, डॉक्युमेंटी , सिरीयल आणि सिनेमा अशा सगळ्या प्रांतात कार्नांडाची जबरदस्त हुकूमती स्वारी सुर होती. त्याचवेळी कन्नडमध्येही तब्बालेयु नेन्नंद मागाने, ओन्दानुदू कालाडाली, चेलुवी आणि कोड्डू आणि कोनोरु हेगडट्टी यासारखे आशयघन सिनेमेही कर्नांडानी दिले. हिंदीतही निशांत, मंथन, स्वामी, पुकार, इक्बाल, डोर, आशाये यासारख्या सिनेमातून आपला ठसा उमटवला.. कलंदर असणारा कलावंत ब़ॉलीवूडच्या व्यावसायिक गणितांच्या सिनेमातही लक्षात राहीला. हमसे है मुकाबला,नायक, एट बाय टेन तस्वीर, आणि अगदी सलमापट असलेल्या एक था टायगर या सिनेमात काम करताना त्यांच कर्नाडपण तसूभरही कमी झालं नाही.. नव्या पिढीशी जुळवून घेताना कार्नांडाना मालगुडी डेजमधील स्वामीचे वडील विसरण कस शक्य होईल.. आणि हेच तर वैशिष्ठ आहे कर्नांडाचे एकाचवेळी प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवर काम करण आणि यशस्वी असणं… अशा दोन्ही पातळीवर फार कमी नाव आढळतात त्यापैकीच एक म्हणजे,  गिरीश कर्नाड..

गिरीश कार्नाडाच्या संपन्न कारकिर्दीवर नजर टाकताना कार्नांडानी आपल्या लेखणीन, आपल्या दिग्दर्शनानं, आपल्या अभिनयानं कलाप्रांत सजवला आणि रसिकाला कलानंदात न्हावू घातलं.. प्रत्येक कलाप्रकारानंतर रसिकांच्या काळजाची पकड घेणे हाच तर त्या कलावंताचा खरा गौरव असतो.. तो गौरव आणि ते अढळपद भारतीय रसिकांनी कार्नांडाना केव्हाच दिलय.. पण पुरस्कारानीही या कलावंतचा वैभव वाढवलय. १९७० साली ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटासाठी सवोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण कमळ पटकावले. १९७२ साली ‘वंशवृक्ष’साठी सवोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘भूमिका’ चित्रपटासाठी सवोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८९ मध्ये कनक पुरंदर चित्रपटासाठी साठी सुवर्ण कमळ मिळाले

कर्नांडाची कलाकृतीची दखल मोठमोठ्या पुरस्काराच्या वेळीही घेतली गेलीय.. कर्नाड यांना १९७० मध्ये होमी भाभा फेलोशिप, १९७२ मध्ये नाट्यलेखनासाठी संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार,१९७२ साली पद्मभूषण पुरस्कार आणि १९९२ मध्ये नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला. याबरोबरच १९९४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार, १९९८ साली ज्ञानपीठ पुरस्कार,कालिदास सन्मान पुरस्कार, २०१२ मध्ये तन्वीर सन्मान पुरस्कार अशा सर्व पुरस्कारांवर गिरीश कर्नाड हे नाव कोरलं गेलंय. नाट्यसेवेतील योगदानाबद्दल कर्नाटक विद्यापीठाकडून डॉक्टरेटने गौरव केला. युनिवर्सिटी ऑफ सर्दन कॅलिफोर्नियाकडून डी.लिट पदवीनं गौरव करण्यात आला.

या आणि अशा असंख्य पुरस्कारावर आपलं नाव कोरणा-या कार्नांडानी मोठमोठ्या जबाबदा-याही यशस्वीपणे पेलल्या.१९७४-७५ साली गिरीश कर्नाड हे भारतीय चित्रपट आणि दुरदर्शनचे दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.

१९७६-७८ मध्ये कर्नाडांनी कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्षपद भुषवल.१९८८ ते १९९३ याकाळात कार्नाड हे नाटक अकादमीचे अध्यक्ष होते.

गिरीश कार्नांडाची कलाप्रांताची दखल घेणे हा खरतर अनेकाच्या अभ्यासाचा विषय बनलाय.. पण या कलावंताने माणूसपणाचं भान राखत समाजाला आपल्या प्रत्येक कलाकृतीनं एक दिशा दिलीय. मराठी मातीच्या संस्कारातून नाट्यधर्माची पताका घेऊन कलेच्या वारीला निघालेला हा कलावंत आपल्यामागे लक्षलक्ष प्रेक्षकांना आणि कलावंतानाही त्याच पायवाटेवरुन मागूते व्हा म्हणत आज दूरच्या प्रवासाला निघालाय..  अलविदा हयवदन..

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.