दिवसभरातील मोठ्या बातम्या - 9 जानेवारी

यवतमाळ यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापूर्वी निर्माण झालेल्या वादामुळे, संमेलनात कुठलीही बाधा येऊ नये याकरिता यवतमाळकरांचा वतीने निमंत्रित तमाम साहित्यिकांना साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. साहित्यिकांनी यवतमाळकरांचे आतिथ्य स्वीकारावं, यवतमाळकर स्वागतासाठी उत्सुक आहेत, साहित्य महामंडळ अध्यक्षांमुळे निर्माण झालेल्या वादातून यवतमाळच्या मातीचे अब्रूचे धिंडवडे निघू नये, अशी यवतमाळकरांची भूमिका …

दिवसभरातील मोठ्या बातम्या - 9 जानेवारी
यवतमाळ
यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापूर्वी निर्माण झालेल्या वादामुळे, संमेलनात कुठलीही बाधा येऊ नये याकरिता यवतमाळकरांचा वतीने निमंत्रित तमाम साहित्यिकांना साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. साहित्यिकांनी यवतमाळकरांचे आतिथ्य स्वीकारावं, यवतमाळकर स्वागतासाठी उत्सुक आहेत, साहित्य महामंडळ अध्यक्षांमुळे निर्माण झालेल्या वादातून यवतमाळच्या मातीचे अब्रूचे धिंडवडे निघू नये, अशी यवतमाळकरांची भूमिका आहे. यवतमाळातील आंबेडकरी, दलित, विद्रोही, सम्यक साहित्यिक तसेच डॉक्टर, वकील, शिक्षण संस्थाचालक आणि सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी सर्व निमंत्रित साहित्यिकांना आवाहन केले आहे.
नवी दिल्ली
शरद पवार आणि राहुल गांधी यांची थोड्याच वेळात बैठक, लोकसभा जागावाटप आणि महाआघाडीसंदर्भात चर्चा होणार, 8 मतदारसंघाबाबत तोडगा निघण्याची शक्यता
अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार, संसदीय मंत्रिमंडळ समितीचा निर्णय, अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प मांडणार
Thursday, August 27, 2018
मुंबई
बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस, तर काल शिवसेना प्रणित संघटनेने या संपातून काढता पाय घेतल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात फूट
Thursday, August 27, 2018
नागपूर
साहित्य संमेलनापूर्वी नाट्यमय घडामोडी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा, ई-मेलद्वारे महामंडळाला राजीनामा पाठवला, नयनतारा सहगल यांच्या वादानंतर श्रीपाद जोशींचा राजीनामा
रायगड
उरण शहरातील हॉटेलमध्ये स्फोट , 4 जखमी, रिक्षातून प्रवास करणारे दोन प्रवासी जखमी, मोझिला हॉटेलमध्ये स्फोट, स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट
नवी मुंबई
#नवीमुंबई - कोपरखैराणे सेक्टर 19 मधील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग, 10 झोपड्या जळाल्या, सुदैवाने कोणीही जखमी नाही, वाशी फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी, आग विझविण्यात यश
मोदी चौथ्यांदा सोलापुरात
नरेंद्र मोदी चौथ्यांदा सोलापुरात, 1) गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 2009,
2) लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 2014
3) त्यानंतर 16 ऑगस्ट 2014 आणि आता
4) 2018 असे चौथ्यांदा येत आहेत
मध्य रेल्वे विस्कळीत
10.10 AM बदलापूर: मध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर वाहतूक विस्कळीत, कर्जत - भिवपुरी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा, पुण्याहून मुंबईला येणाऱ्या रेल्वेसेवेला मोठा फटका, कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकलसेवाही ठप्प, दुरुस्तीचं काम सुरु
सोलापूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरात दाखल,हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करणार
नाशिक
6 लाखांची लूट करून व्यावसायिकाची हत्या, नाशिकच्या इंदिरानगरमधील काल रात्रीची धक्कादायक घटना, अविनाश शिंदे हे व्यावसायिक दुकान बंद करून घरी जात असताना हत्या, अज्ञात हल्लेखोरांकडून अविनाश यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न, हल्लेखोर फरार
बीड
सोलापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आश्वासन मिळणार, अमित शहा यांचं वक्तव्य बालिशपणाचे, चार राज्यातील निकाल बघा काय होईल लक्षात येईल - रामदास कदम, शिवसेना
पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण जाहीर केल्यानं आनंदाचं वातावरण, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून निर्णयाचं स्वागत, ब्राह्मण महासंघ आनंदोत्सव साजरा करणार, आरक्षणातील विघ्न दूर व्हावे म्हणून शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करणार
Thursday, August 31, 2018
सोलापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन, हवेत पाण्याचे फुगे सोडले, सोलापूरच्या सभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याचा आरोप, 100 पेक्षा अनेक कार्यकर्ते ताब्यात
Thursday, August 31, 2018
मुंबई
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक तहकूब करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांची मागणी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पत्र, काँग्रेस, समाजवादी पक्षाचा पाठिंबा
नवी दिल्ली
सवर्णांना आर्थिक आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर, विधेयकाला भाजपसह विरोधकांचाही पाठिंबा, लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार
Thursday, August 29, 2018
जागतिक बँक
2018-19 मध्ये भारत जगातील सर्वात वेगाने विकसित हेणारी अर्थव्यवस्था ठरेल, जागतिक बँकेचा अंदाज, चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7.3 टक्के राहण्याचंही भाकित
Thursday, August 29, 2018
Thursday, August 28, 2018
नागपूर
नागपुरात भाजपच्या नावाने बोगस ऑनलाईन सर्व्हे सुरु असल्याचं समोर, ‘स्ट्रॉपोल’नावाच्या संकेतस्थळावर दक्षिण नागपूरचा पुढील आमदार कोण याबाबतचा सर्व्हे, हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दाखल
Thursday, August 28, 2018
नंदुरबार
सातपुड्याच्या दुर्गम भागात थंडीचा कडाका वाढला, तापमान 2 अंशाच्या खाली, अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात दवबिंदू गोठले. दुर्गम भागात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *