Paytm – Google Pay मुळे त्रस्त असाल तर आता नो टेन्शन, RBI कडून बंदोबस्त

Paytm - Google Pay मुळे त्रस्त असाल तर आता नो टेन्शन, RBI कडून बंदोबस्त
RBI Shakrikanta das

अनेकदा ग्राहकांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता आरबीआय एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. Bank Services Complaints RBIORG Customers

Akshay Adhav

|

Feb 05, 2021 | 1:08 PM

नवी दिल्ली : पेटीएम-गुगप पे यांसारख्या डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म अनेक वेळा ग्राहकांना निराश करतं. कधी अधिकचे पैसे कट होतात तर कधी मनासारखी सेवा मिळत नाही. अनेकदा ग्राहकांना अश्या प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु आता आरबीय नवीन धोरण आखण्याचा विचारात आहे. दस्तुरखुद्द आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक 2021 मध्ये NBFC तसंच डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मसाठी एका लोकपाल योजना आणणार आहे, यासंबंधीची घोषणा शक्तीकांता दास यांनी केली आहे. ग्राहकांच्या अडचणींचं तथा समस्येचं निवारण लगोलग व्हावं, यासाठी ही घोषणा केली गेली आहे. आयरबीआय ग्राहकांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन बेससाईटवरुन उपलब्ध आहे. या पोर्टलवर बँक तसंच वित्तीय कंपन्या यांच्यासंबंधी समस्येचं निराकरण ऑनलाईन करता येणार आहे. तक्रार करतावेळी आपल्याला बँकेची पूर्ण माहिती द्यावी लागेल तसंच नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यावा लागेल.

इथून पुढे काय होणार?

आरबीआयने सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्मवरील तक्रारी दूर करण्यासाठी 24 ×7 हेल्पलाईन सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशी जर हेल्पलाईन सुरु केली तर या प्लॅटफॉर्मवर चांगली सेवा मिळेल, अशी आरबीआयला आशा आहे. त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वासही वाढेल. ही वेबसाईट आर्थिक आणि मानव संसाधन या दोन्हीवरची असलेला खर्च कमी करेल.

भारतात तीन लोकपाल योजना आहेत, 1) बँकिंग लोकपाल योजना 2) नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठीची लोकपाल योजना 3) डिजीटलसाठी लोकपाल योजना… रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची २० हून अधिक लोकपाल कार्यालये देशभरातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे काम करतात.

तक्रारींसाठी पहिले सीएमएस पोर्टल आहे. परंतु नवीन पोर्टलचा थेट ग्राहकांना फायदा होईल. बँका, एनबीएफसी आणि बिगर बॅंकांच्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सचे ग्राहक लवकरच केंद्रीय पोर्टलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतील.

आता अशा प्रकारे करु शकता एसबीआयमध्ये तक्रार

एसबीआयसह सर्व सरकारी आणि खासगी बँका ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही तक्रारी नोंदवतात. हे ऑफलाइन फॉर्म, एसएमएस किंवा कॉलद्वारे केले जाऊ शकते. आपण या पद्धतींद्वारे डेबिट कार्ड संबंधित समस्यांद्वारे तक्रार देखील दाखल करू शकता

आपण एसएमएसद्वारे तक्रार देखील करू शकता…

जर बँक आपल्याला असमाधानकारक सर्विस देत असेल तर आपण आता एसएमएसद्वारेही तक्रार करु शकता. आपल्याला ‘UNHAPPY’टाईप करुन 8008202020 या नंबरवर तो मेसेज टाईप करायचा आहे. मेसेज केल्यानंतर आपल्याला बँक कर्मचाऱ्यांचा कॉल येईल आणि आपल्याला समस्येचं निराकरण होईल. यासाठीचा टोल फ्री नंबर 1-800-425-3800/1-800-11-22-11 हा आहे.

हे ही वाचा :

Home Buying Tips | पहिलंच घर खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें