Budget 2021: मोदींकडून देशाच्या संपत्तीचं भांडवलदार मित्रांना हँडओव्हर; राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर अवघ्या दोन ओळीचं ट्विट करून टीका केली आहे.  (Government handing over India’s assets to crony capitalists says Rahul Gandhi )

Budget 2021: मोदींकडून देशाच्या संपत्तीचं भांडवलदार मित्रांना हँडओव्हर; राहुल गांधींची टीका
राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर अवघ्या दोन ओळीचं ट्विट करून टीका केली आहे. मोदी सरकार देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांना हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  (Government handing over India’s assets to crony capitalists says Rahul Gandhi )

राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात गरीबांसाठी काहीच देण्यात आलेलं नाही. गरीबांच्या हातात रोख रक्कम येण्याची बात सोडाच, पण मोदी सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांना देशाची संपत्ती हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

गरीबांच्या हातात थेट रोख रक्कम देण्याची राहुल गांधी यांनी अनेकदा मागणी केली आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी ही मागणी केली होती. गरीबांच्या हातात पैसा आला तर ते खर्च करतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा राहुल यांचा तर्क आहे. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने अशा कोणत्याच योजनेची घोषणा केलेली नाही.

आदित्य ठाकरेंची टीका

दरम्यान, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी अधिकच जास्त गिफ्ट देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

मरणाच्या दारात नेऊन ठेवलं: अजित पवार

कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.  (Government handing over India’s assets to crony capitalists says Rahul Gandhi )

 

संबंधित बातम्या:

Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Policy चा परिणाम काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI