Budget 2021 | पंतप्रधान किसान स्किमची रक्कम वाढणार?; बळीराजा सुखावणार?

शेती करण्यासाठी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच शेतकऱ्यांनी वर्षाला 6000 रुपये दिले जात आहेत.

Budget 2021 | पंतप्रधान किसान स्किमची रक्कम वाढणार?; बळीराजा सुखावणार?

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकार अन्नदात्यासाठी (Farmers) एक मोठी घोषणा (Budget 2021 Modi Government ) करण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात सर्वात महत्त्वाची योजना “प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना” यामध्ये (Pradhan Mantri kisan Samman Nidhi Scheme) वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक काळापासून अनेक शेतकरी संगठनांनी आणि विशेषज्ज्ञ या रकमेत वाढ करण्याची मागणी करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवण्यात येत आहेत (Budget 2021 Modi Government).

याअंतर्गत आता शेती करण्यासाठी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच शेतकऱ्यांनी वर्षाला 6000 रुपये दिले जात आहेत. कृषी तज्ज्ञांनुसार, या रकमेत झाली तर अन्नदात्याची आर्थिक स्थिती सुधारेल. कृषी तज्ज्ञांनुसार, शेतकऱ्यांना थेट पैसे देणे जास्त फायदेशीर ठरतं.

शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचा सल्ला कुणी दिला?

– शेती तज्ज्ञ विनोद आनंद यांनी सब्सिडी संपवून शेतकऱ्यांना वर्षाला 24 हजार रुपये देण्याची मागणी केली होती

– शेतकरी शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी दर महिन्याला 2000 रुपये देण्याची मागणी केली होती.

– माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पीएम शेतकरी योजनेअंतर्गत 12,000 रुपये देण्याचा सल्ला दिला आहे.

– स्वामीनाथन फाउंडेशनने याची रकम 15,000 रुपये वर्षाला करण्याचा सल्ला दिला आहे.

– SBI चे ग्रुप चीफ इकोनॉमिक अॅडव्हायझर सौम्य कांती घोष यांनी ही मदत 8,000 रुपये करण्याची सल्ला दिला होता.

– पीएम शेतकरी योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात

सोमपाल शास्त्रींची मागणी

माजी केंद्रीय कृषी मंत्री सोमपाल शास्त्री यांच्या मते, “2017 मध्ये त्यांनी स्विट्जरलंडला जाऊन तितल्या शेती मॉडलचा अभ्यास केला. तेव्हा तिथल्या सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला प्रती हेक्टर 2993 युरो म्हणजेच जवळपास 2.5 लाख रुपये शेती करण्यासाठी शिष्यवृत्ती म्हणून देतात. यांनी एक लाख रुपये एकर याप्रमाणे पशुपालकांना 300 युरो म्हणजेच जवळपास 25,000 रुपये मिळत होते.”(Budget 2021 Modi Government)

भारतातही या मॉडेलवर शेतकऱ्यांना एक निश्चित रक्कम देण्याची मागणी केली होती. देशात 86 टक्के छोटे शेतकरी आहेत. त्यांना 20 हजरा रुपये एकर मदत दिली जावी, अशी माझी मागणी आहे. तर मोठ्या शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रती एकर, 10 हेक्टरपेक्षा जास्त शेती करणाऱ्या 10 हजार रुपये प्रती एकर सरकारी मदत दिली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

Budget 2021 Modi Government

संबंधित बातम्या :

Budget 2021: यंदाचा बजेट मेड इन इंडिया टॅबमधून; खासदारांना पेन ड्राईव्हमध्ये मिळणार बजेट

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

Budget 2021: मध्यमवर्गीयांनी या 6 घोषणांकडे लक्ष ठेवावं, थेट खिशावर परिणाम होऊ शकतो

Budget 2021: काय स्वस्त होणार आणि काय महागणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI