Budget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:

Budget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा  सारांश:
बजेटमध्ये टॅक्सबाबत दिलासा मिळणार?

इंडिया रेटिंग्सच्या अहवालात कोविड प्रकोपामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 28, 2022 | 10:50 PM

नवी दिल्लीकोविडमुळं (Corona) अर्थचक्राची गती मंदावली आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध शिफारशी आणि अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. इंडिया रेटिंग्स (India Ratings) या आघाडीच्या रेटिंग्स एजन्सीने आगामी अर्थसंकल्पात (Budget 2022)अर्थव्यवस्थेला अनुकूल धोरण आणि इंधनावरील कर कपात करण्याची गरज दर्शविली आहे. इंडिया रेटिंग्सने अर्थसंकल्प पूर्व अहवाल घोषित केला आहे. या अहवालात इंडिया रेटिंग्सने मागील वर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणाऱ्या योजनांना बळकटी द्यावी. नव्याने योजनांचे समावेश करणे टाळावे असे निरीक्षण नोंदविले आहे. इंडिया रेटिंग्सच्या अहवालात कोविड प्रकोपामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. आगामी अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी नव्या योजनांची घोषणा न करता नव्या निधीची तरतूद करू नये. सध्याच्या योजनांना बळकटी देऊन टप्प्या-टप्प्याने अर्थव्यवस्था सुधारणेला चालना द्यावी असे मत इंडिया रेटिंग्सच्या अहवालातून मांडले आहे.

करदिलासा-आयकर फेरबदल:

कोविड प्रकोपामुळे सर्वसामान्यांच्या खरेदी क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इंडिया रेटिंग्सने अर्थसंकल्पात नवे पर्याय सुचविले आहेत. आयकर संरचनेत बदल करावा तसेच पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असे मत इंडिया रेटिंगने व्यक्त केले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात अनुदानाची वाढती मागणी विचारात घेता अर्थसंकल्पाचा आकार वाढण्याची शक्यता आहे. बिनव्याजी आणि विना-अनुदानित घटकांमुळे अर्थसंकल्पावर परिणाम होऊ शकतो. रेटिंग एजन्सीच्या मते, आगामी आर्थिक वर्षात राजकोषीय खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेने अधिक असण्याचीच शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तपशील:

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होईल. 31 जानेवारीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सदनांना संबोधित करतील. दोन सत्रात होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात अर्थसंकल्प मांडला जाईल. 11 फेब्रुवारीला सत्र समाप्त होईल. दुसरे सत्र 14 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीदरम्यान असेल.

अर्थसंकल्प कुठे पाहू?

तुम्ही अर्थसंकल्प 2022 भाषण पाहू किंवा ऐकू इच्छित असल्यास तुमच्यासाठी एकाधिक पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही थेट संसद टीव्हीद्वारे पाहू शकतात. सध्या सर्वच खासगी वाहिन्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रसारण करतात. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असेल. जाहिराती टाळायच्या असतील तर दूरदर्शन वरुन प्रसारित होणारे अर्थसंकल्प पाहू शकता.

Budget 2022 : डिजिटल भारत ते स्वस्तात इंटरनेट, टेलिकॉम क्षेत्राला हवी सवलतींची ‘रेंज’!

Budget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार? Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें