देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला, अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:34 PM, 5 Jan 2021
Seventeenth Loksabha Fifth Session

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 1 फेब्रुवारीला बजेट सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) दोन भागांत चालणार आहे. पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग 8 मार्चपासून सुरू होणार असून, 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. (Budget Session Of Parliament Will Commence On January 29 Union Budget Will Be Tabled On February 1)

विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्र सरकारने यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन घेतले नव्हते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मोदी सरकारचे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना एक पत्र लिहिले होते. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोनाच्या साथीच्या निमित्ताने अधिवेशन न बोलवण्यावर एकमत झालंय, असंही त्यांनी पत्रात लिहिलं होतं. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारी 2021 मध्ये बोलावण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू

केंद्र सरकारने तर संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच करून टाकले होते. अर्थातच कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू केली होती. उद्योग, कारखाने, बाजार, दुकाने हळूहळू सुरू केली गेली होती, चित्रपट आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली होती, व्यायामशाळा सुरू केल्या, केंद्राच्या सूचनेनुसार अनेक राज्यांनी उच्च माध्यमिक शाळाही सुरू केल्या होत्या. अर्थचक्र सुरळीत चालण्यासाठी हे आवश्यकच होते. अनलॉकमुळे कोरोनाचा प्रकोप वाढल्याचे दिसले नाही. सप्टेंबरमध्ये कोरोनाचे रोज 75 ते 80 हजार रुग्ण देशात आढळत असताना आणि लस केव्हा येईल हे माहीत नसताना केंद्र सरकारने संसदेचे पावसाळी अधिवेशन घेतले होते. त्यात पटापट तीन कृषी विधेयके मंजूर करून घेतली.

संबंधित बातम्या

भर विधानसभेत केजरीवालांचा संताप, कृषी कायद्यांच्या प्रती टराटरा फाडल्या

राज्य सरकार टिकवण्यासाठी कृषी कायद्यांवरुन शिवसेना, राष्ट्रवादीचे घुमजाव, कपिल पाटलांचा आरोप

Budget Session Of Parliament Will Commence On January 29 Union Budget Will Be Tabled On February 1