अर्थसंकल्पानंतर सोने, चांदी दरात काय होतोय बदल, आजचा दर पाहा

जितेंद्र झंवर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 06, 2023 | 12:49 PM

गेल्या दोन महिन्यांत दहा ग्रॅम सोन्याचा दर सुमारे सात हजार रुपयांनी वाढला आहे. अर्थसंकल्पामुळे सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

अर्थसंकल्पानंतर सोने, चांदी दरात काय होतोय बदल, आजचा दर पाहा

नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोने, चांदीचे (Gold and Sliver Rate)दर वाढले होते. गेल्या काही काळात सोन्याच्या दरात जबरदस्त उसळी आली होती. सोन्याच्या दराने विक्रमी 60 हजार रुपयांचा (10 ग्रॅम) भाव गाठला होता. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या दोन महिन्यांत दहा ग्रॅम सोन्याचा दर सुमारे सात हजार रुपयांनी वाढला आहे. अर्थसंकल्पामुळे सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

एप्रिल फ्युचर्समध्ये MCX सोने 56,934 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहे. या परिस्थितीत सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, एमसीएक्स सिल्व्हर मार्च फ्युचर्स 240 रुपयांच्या वाढीसह 67,816 रुपये प्रति किलोवर आहे. दुसरीकडे, जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढीचा कल दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड 11.90 डॉलरने वाढून 1,877.03 डॉलर प्रति औंस वर व्यापार करत होता. दुसरीकडे, स्पॉट चांदीमध्ये प्रति औंस $ 0.11 ची वाढ नोंदवली गेली आहे. स्पॉट चांदीच्या किमती $ 22.46 प्रति औंस आहेत.

गुंतवणुकीसाठी सोने चांगले

हे सुद्धा वाचा

सोने हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये सोन्याचा भाव ५० ते ५२ हजार रुपयांच्या दरम्यान होता. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ६० हजार रुपये प्रति ग्रॅमच्या पातळीवर होता. यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्यात गुंतवणूक करणारे लोकांना आज चांगला नफा मिळाला आहे. एवढेच नाही तर वर्षानुवर्षे सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याने लोकांना मोठा फायदा होत आहे.

गुंतवणूकदार वाढले

आता सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. पूर्वी सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 28 जानेवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 57 हजार 190 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 30 जानेवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 57,080 रुपये, 31 जानेवारी 2023 रोजी 56,860 रुपये, 1 फेब्रुवारी 2023 रोजी 57,910 रुपये आणि 2 फेब्रुवारी 2023 रोजी 60,000 रुपये होता.

चांदीमध्ये घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीचे दर वाढले होते. चांदी 72 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी होती. सोमवारी चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. चांदी 67,703 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. चांदीच्या दरातही घसरणीचा फायदा गुंतवणूकदारांनी घेतला पाहिजे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI