देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार; 17 व्या लोकसभेचे पाचवे अधिवेशन 29 जानेवारीला

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:30 PM, 14 Jan 2021
Seventeenth Loksabha Fifth Session

नवी दिल्लीः 17 व्या लोकसभेचे (Seventeenth Lok Sabha) पाचवे सत्र (Fifth Session) 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अधिवेशन 8 एप्रिल रोजी संपुष्टात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा सचिवालयाने सांगितले आहे की, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल. (Seventeenth Loksabha Fifth Session Commence January Twenty Nine)

लोकसभा सचिवालयाच्या निवेदनानुसार दोन टप्प्यांत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून, 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारीपासून सुरू होईल आणि 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, तर दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात चालणार आहे. निवेदनानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.दुसर्‍या टप्प्यातील बैठक 8 मार्चपासून सुरू होणार

संसदीय स्थायी समितीला विविध मंत्रालये / विभागांकडून अनुदानाच्या मागण्यांवर विचार करण्याची सोय करण्यासाठी अधिवेशनाचा पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केला जाणार आहे आणि बैठकीचा दुसरा टप्पा 8 मार्चपासून सुरू होणार आहे. कोविड 19 शी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केले जाईल.
विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यात आले नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नसल्याचे सरकारने म्हटले होते. सरकार इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी पळ काढत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला, अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

Seventeenth Loksabha Fifth Session Commence January Twenty Nine