18 ते 40 वयोगातील लोकांसाठी खास पेन्शन योजना, जाणून घ्या फायदे

PM-SYM योजनेत तुम्हाला कमीतकमी महिन्याला 3 हजार रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या पेन्शन खात्यात जास्त रक्कम टाकली तर तुम्हाला 60 वर्षानंतर जास्त पेन्शनही मिळू शकते.

18 ते 40 वयोगातील लोकांसाठी खास पेन्शन योजना, जाणून घ्या फायदे
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:55 PM

मुंबई: तुमचं वय 18 ते 40 वर्षे आहे आणि तुमचा पगार 15 हजारापेक्षा कमी आहे, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. तसंच तुमचा निवृत्तीनंतरचाही कुठला प्लॅन तयार नाही, तर तुमच्यासाठी केंद्र सरकारनं एक खास पेन्शन स्कीम देऊ केली आहे. त्यात 60 वर्षानंतर तुम्हाला महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. PM-SYM असं या योजनेचं नाव आहे. (Benefits and Procedures of the Pradhanmanti shramyogi mandhan pension yojna)

किती पेन्शन मिळणार?

PM-SYM योजनेत तुम्हाला कमीतकमी महिन्याला 3 हजार रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या पेन्शन खात्यात जास्त रक्कम टाकली तर तुम्हाला 60 वर्षानंतर जास्त पेन्शनही मिळू शकते. हा पर्याय सर्वांसाठी सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.

अकाऊंट कसं उघडाल?

पेन्शन अकाऊंट उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरवर जावं लागेल. त्याचबरोबर LIC किंवा कामगार कल्याण विभागाच्या बेवसाईटवर जाऊनही तुम्ही अकाऊंट उघडू शकता. इतकच नाही तर जिल्हा कामगार कल्याण कार्यालय, LIC कार्यालय किंवा EPF आणि ESIC कार्यालयात जाऊनही अकाऊंट उघडू शकता.

अकाऊंट कोण उघडू शकतं?

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार PM-SYM योजनेत असंघटीत क्षेत्रातील कामगार अकाऊंट उघडू शकतात. त्याचबरोबर ज्यांचा महिन्याचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांचं वय 18 ते 40 वर्षांमध्ये आहे, असे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत.

ज्या व्यक्तीचं EPF/NPS/ESIC खाते पहिल्यापासून आहे असे लोक या योजनेत अकाऊंट उघडू शकत नाहीत. तसंच तुमची उत्पन्नही टॅक्सेबल असता कामा नये.

कोणती कागदपत्रे लागतात?

1. आधार कार्ड 2. बँक खात्याची माहिती – पासबूक, चेकबूक, IFSC कोड

नाव नोंदणी करा

– घराजवळील CSC केंद्रावर जाऊन अकाऊंट उघडू शकता. CSC केंद्र माहिती नसेल तर LIC, कामगार कार्यालय किंवा CSCच्या वेबसाईटवर नाव नोंदणी करु शकता.

– सोबत आधार कार्ड, बँक पासबूक, चेकबूक किंवा बँक स्टेटमेंट सोबत ठेवा

– सुरुवातीला किती रक्कम खात्यात टाकायची आहे ती रक्कम सोबत घ्या

– अन्य योजनांमध्ये केलेल्या गुंतवणीकीची कागदपत्रही सोबत ठेवा

संबंधित बातम्या:

PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका, ‘हे’ आहे कारण

Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका

Benefits and Procedures of the Pradhanmanti shramyogi mandhan pension yojna

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.