7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या नाईट अलाऊन्सबाबत महत्त्वाची बातमी, 1 जुलैपासून मोठा फायदा

केंद्र सरकारचे 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 60 लाखांहून अधिक पेन्शनधारक 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. Central Employees Night Allowance

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:07 PM, 17 Apr 2021
1/6
MONEY
7th Pay Commission: केंद्र सरकारचे 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 60 लाखांहून अधिक पेन्शनधारक 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महागाई भत्त्याबरोबरच नाईट अलाऊन्सबाबत सरकार निर्णय घेऊ शकते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2020 पासून केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यातील वाढ थांबविण्यात आली होती.
2/6
Covid 19 Pandemic Employees Salary
Covid 19 Pandemic Employees Salary
3/6
नव्या नियमानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत रात्र पाळीत काम करणाऱ्यांना नाईट अलाउन्सचा फायदा होईल. जुलै 2020 च्या डीओपीटी मार्गदर्शक तत्त्वानुसार जर एखाद्याचे मूलभूत वेतन 43,600 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला नाईट अलाऊन्स मिळणार नाही.
4/6
pf account balance
Money
5/6
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मार्चमध्ये संसदेत सांगितले होते की, सरकार 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता पूर्ववत होईल. सध्या महागाई भत्ता 17 टक्के आहे. 1 जुलैला तो वाढून 28 टक्क्यांपर्यंत जाईल. महागाई भत्ता वाढल्यामुळे नाईट अलाऊन्स वाढेल. कोरोनामुळे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी महागाई भत्ता गोठवण्यात आला होता.
6/6
special fixed deposit scheme
सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या मूलभूत वेतनाच्या आधारे नाईट अलाऊन्सची गणना स्वतंत्रपणे करावी लागेल. आतापर्यंत ग्रेड ए मधील सर्व कर्मचार्‍यांना समान नाईट अलाऊन्स देण्यात आला होता. आता हा नाईट अलाऊन्स नवीन यंत्रणेत उपलब्ध होईल. कर्मचार्‍यांनी किती नाईट अलाऊन्स जमा केला, याची गणना कर्मचाऱ्यांच्या पर्यवेक्षकाद्वारे दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे केली जाईल. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत काम करतानाच नाईट अलाऊन्स देण्यात येईल.