परदेशातून येणाऱ्या मदतीवर आता IGST नाही; कोरोना काळात मोदी सरकारचा मोठा दिलासा

कोविड 19 च्या मदतीसाठी सरकारला IGST मधून सवलत देण्यात आलीय. अनेक दानशूर संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि इतर संस्था/भारताबाहेरील संघटनांकडून देशात IGST तून सवलत देण्याची विनंती केली होती. Modi government relief IGST

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:11 PM, 3 May 2021
परदेशातून येणाऱ्या मदतीवर आता IGST नाही; कोरोना काळात मोदी सरकारचा मोठा दिलासा
Modi government relief IGST

नवी दिल्ली: मोदी सरकारने कोरोनाच्या संकटात दिलासा देण्यासाठी कोविडशी संबंधित मदत सामग्रीवर वस्तू आणि सेवा करातून (IGST) सूट जाहीर केलीय. वित्त मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड 19 च्या मदतीसाठी सरकारला IGST मधून सवलत देण्यात आलीय. अनेक दानशूर संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि इतर संस्था/भारताबाहेरील संघटनांकडून देशात IGST तून सवलत देण्याची विनंती केली होती. (A big relief for the Modi government during the Corona period, IGST will not be imposed on foreign aid)

कोविड मदतीच्या सामग्रीला आयजीएसटीतून सूट

या निवेदनात म्हटले आहे की, “केंद्र सरकारने देशातील विनामूल्य वितरणासाठी आयात आणि विनाशुल्क कोविड मदतीच्या सामग्रीला आयजीएसटीतून सूट दिलीय. ही सूट 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे. ” तत्पूर्वी सीमा शुल्काला बंदरांवर मंजुरी न मिळाल्यामुळे आतापर्यंत वस्तूंवरची ही सूट धूळखात पडून होती. सरकारने यापूर्वीच रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या मुख्य रसायने (एपीआय), चिकित्सा स्तरावरील ऑक्सिजन, ऑक्सिजन संयोजक, क्रायोजेनिक ट्रान्सपोर्ट टँक आणि कोविड लसी यांसारख्या वस्तूंच्या आयातीवरील सीमा शुल्कात सूट जाहीर केलीय.

कोणास सूट मिळणार?

मदत सामग्रीच्या विनामूल्य वितरणासाठी आयजीएसटी सवलत नोडल ऑथोरिटी, अधिकृत संस्था, मदत एजन्सी किंवा राज्य सरकारद्वारे नियुक्त केलेल्या वैधानिक मंडळाच्या मंजुरीवर अवलंबून असेल. देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोविड संसर्गाची सोमवारी 3.68 लाख प्रकरणे नोंदली गेली, तर 3,417 लोकांचा मृत्यू. गेल्या आठवड्यात दररोज संसर्गाची प्रकरणे 4 लाखांच्या वर गेली.

संबंधित बातम्या

कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

UIDAI ने महत्त्वाचा नंबर केला जारी, तात्काळ फोनमध्ये सेव्ह करा, सर्व समस्या होणार दूर

A big relief for the Modi government during the Corona period, IGST will not be imposed on foreign aid