Pensioners ना मोठा दिलासा, आता आधारशिवाय बनणार हयातीचा दाखला

काही काळ डिजिटल हयातीच्या दाखल्याची सुविधा सुरू करण्यात आली, त्यानंतर बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यापासून दिलासा मिळाला. post office doorstep digital life certificate

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:41 PM, 12 Apr 2021
Pensioners ना मोठा दिलासा, आता आधारशिवाय बनणार हयातीचा दाखला
post office doorstep digital life certificate

नवी दिल्लीः पेन्शन मिळत असल्यास तुमच्यासाठी हयातीचा दाखला खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी तो जमा करावा लागतो. जर उशीर झाला तर पेन्शन रोखली जाण्याची शक्यता आहे. पूर्वी पेन्शनधारकांना यासाठी बँक किंवा टपाल कार्यालयात जावे लागत असे. काही काळ डिजिटल हयातीच्या दाखल्याची सुविधा सुरू करण्यात आली, त्यानंतर बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यापासून दिलासा मिळाला. परंतु आधार कार्ड अनिवार्य केल्यानंतर वडिलधाऱ्यांना अजूनही अडचणी येत होत्या. (aadhaar not mandatory for life certificate post office doorstep digital life certificate)

डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला तयार करण्यात अडचणी

आता आधारकार्डची अनिवार्यताही संपुष्टात आलीय. आधार सक्तीमुळे डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला तयार करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. फिंगर प्रिंट आणि रेटिनाचे डिटेक्शन योग्य पद्धतीने केले जात नाही आणि यामुळे डिजिटल हयातीचा दाखला तयार करण्यात अडचणी येत आहेत. आता आधार ऐच्छिक करण्यात आलेय, यासाठी सरकारने मार्च अखेर अधिसूचना जारी केली. आयटी मंत्रालयाने 18 मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली होती.

भारत पोस्ट ऑफिसमध्ये येऊन बनवावा लागतो हयातीचा दाखला

इंडिया पोस्ट वयोवृद्ध व्यक्तींना डोअरस्टेप डिजिटल हयातीचा दाखला देते. ही सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहक आणि बिगर ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात विनंती पाठवावी लागेल. हे पोस्ट इन्फो मोबाईल अ‍ॅपवर क्लिक करून किंवा https://ccc.cep.gov.in/ServiceRequest/request.aspx या टॅबवर क्लिक करून करता येईल.

70 रुपये आकारले जातील

डिजिटल हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असेल. प्रमाणपत्रही त्वरित तयार केले जाते. प्रत्येक वेळी जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी 70 रुपये शुल्क आकारले जाईल. जर आपल्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर आपोआपचे शुल्क शून्य असेल.

संबंधित बातम्या

‘या’ कार्डाद्वारे फक्त 4% व्याजावर मिळणार 3 लाखांपर्यंत कर्ज, 15 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी

LIC कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, पगारामध्ये थेट 20% वाढ

aadhaar not mandatory for life certificate post office doorstep digital life certificate