Market Updates: ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी, ट्रेडमध्ये दबदबा कायम

Market Updates: ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी, ट्रेडमध्ये दबदबा कायम
शेअर मार्केट

आज निफ्टी-50 वर अनेक शेअर्सने 52 आठवड्यांचा सर्वोच्च टप्पा गाठला. यामध्ये सुप्रिया लाईफसायन्स, ज्युबिलंट इंडस्ट्रिज, डी.पी.आभूषण, स्मार्टलिंक होल्डिंग्स लिमिटेड आणि गोकळदास एक्स्पोर्टस लिमिटेड यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे. मार्केट विश्लेषकांच्या अंदाजानुसार 29 डिसेंबरला शेअर्स ट्रेडिंग मध्ये राहण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Dec 28, 2021 | 11:13 PM

नवी दिल्ली- शेअर्स बाजारात सेन्सेक्स 477अंकांच्या वाढीसह 57,897.48 अंकांवर बंद झाला. निफ्टी 147 अंकांच्या वाढीसह 17,233.25 अंकांवर जाऊन पोहोचला. आज सेन्सेक्स वर सन फार्मा (Sun Pharma), एशियन पेंट्स (Asian Paints), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) अल्ट्रा टेक सिमेंट (UltraTech Cement) आणि एनटीपीसी (NTPC) सारख्या कंपन्यांचा वरचष्मा राहिला. या सर्व शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. तर इंड्सइंड (Induslnd Bank) आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Power Grid Corporation of India) च्या शेअर्सला मोठा फटका बसला.

मार्केट अपडेट दृष्टीक्षेपात:

o सेंन्सेक्समध्ये 477 अंकांनी वाढ, 55,897.48 अंकांवर बंद
o निफ्टी 147 अंकानी वाढ, 17,233.25 अंकांवर बंद
o सन फार्मा, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट व एनटीपीसी सर्वाधिक नफा
o इंडसइंड बँक व पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला नुकसानाची झळ

सन फार्मा-

सन फार्माच्या सहाय्यक कंपन्यांना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली. याद्वारे कंपनीला एमएसडीचे जेनरिक वर्जन निर्मिती आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. मोलनुपीरवीरच्या (Molnupiravir) क्लिनिकल डाटाच्या आधारावर कोविड साठी वयस्कर रुग्णांच्या उपचारासाठी वापरास मान्यता देण्यात आली आहे. कोविड बाधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये मोलनुपीरवीर (Molnupiravir) महत्वपूर्ण मानली जाते.

इंडसइंड बँक- बँकेने ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट लॉंच केले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असलेली आस्थापने आणि प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. अशाप्रकारची सुविधा प्रदान करणाऱ्या जगातील निवडक बँकांत इंडसइंडचा समावेश होतो. एसडीजी सेक्टरमध्ये समाविष्ट विविध प्रकारचे उद्योग उर्जा सुरक्षितता, नूतनीकरणयोग्य उर्जा, ग्रीन ट्रान्सपोर्ट, शाश्वत अन्न व कृषी, वने, कचरा व्यवस्थापन आणि हरीत गृह वायू उर्त्सजनात कपात यासाठी केला जातो.

52 आठवड्यांत सर्वोच्च टप्पा:

आज निफ्टी-50 वर अनेक शेअर्सने 52 आठवड्यांचा सर्वोच्च टप्पा गाठला. यामध्ये सुप्रिया लाईफसायन्स, ज्युबिलंट इंडस्ट्रिज, डी.पी.आभूषण, स्मार्टलिंक होल्डिंग्स लिमिटेड आणि गोकळदास एक्स्पोर्टस लिमिटेड यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे. मार्केट विश्लेषकांच्या अंदाजानुसार 29 डिसेंबरला शेअर्स ट्रेडिंग मध्ये राहण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

चांगल्या बँकिंगसाठी Bad Bank :  कर्ज वसुलीसाठी नवीन प्रयोग, बँकेची बॅलन्सशीटही सुधारणार

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा

IPO Tracker | मेडिकेअर लिमिटेडचा लवकरच आयपीओ, 2 हजार कोटींचे उद्दिष्ट


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें