..टाटा है तो मुमकिन है, AIR INDIA कर्मचाऱ्यांना इन्श्युरन्स कव्हर; स्टॉक ऑप्शन सुविधा

..टाटा है तो मुमकिन है, AIR INDIA कर्मचाऱ्यांना इन्श्युरन्स कव्हर; स्टॉक ऑप्शन सुविधा
Image Credit source: TV9

नवीन मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी संदर्भात विमान प्राधिकरणाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तपशीलवार माहिती सादर करण्यात आली आहे. यामध्ये नेटवर्क हॉस्पिटल्सचा देखील समावेश आहे. हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून कर्मचारी कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 15, 2022 | 11:13 AM

एअर इंडियाची (AIR INDIA) सूत्रं टाटा समूहाच्या हाती गेल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. कर्मचारी केंद्रित धोरणांसाठी विख्यात असलेल्या टाटा समूहाने (TATA GROUP) एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन मेडिकल इन्श्युरन्स सुविधेची घोषणा केली आहे. आजपासून सर्व स्थायी व अस्थायी स्वरुपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना इन्श्युरन्सचं कवच (INSURANCE PROTECTION) प्राप्त होणार आहे. विमान कंपनीच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रकटीकरणानुसार विम्याची रक्कम 7.5 लाख रुपये असणार आहे. यामध्ये कुटुंबातील एकूण सात व्यक्तींना संरक्षण प्राप्त होणार आहे. स्वत: कर्मचारी, पती/पत्नी, तीन मुले आणि आई-वडील किंवा सासु-सासरे अशा व्यक्ती इन्श्युरन्स संरक्षणाच्या कक्षेत समाविष्ट होतील. विशेष म्हणजे मेडिकल इन्श्युरन्स साठी कॉर्पोरेट बफरची सुविधा उपलब्ध असणार आहे.

नवीन मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी संदर्भात विमान प्राधिकरणाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तपशीलवार माहिती सादर करण्यात आली आहे. यामध्ये नेटवर्क हॉस्पिटल्सचा देखील समावेश आहे. हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून कर्मचारी कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करू शकतात.

नव्या पॉलिसीची वैशिष्ट्ये

· स्थायी-अस्थायी कर्मचाऱ्यांना थेट इन्श्युरन्स संरक्षण

· 7.5 लाख रुपयांचे विमा कवच

· कुटुंबातील प्रत्येक घटक इन्श्युरन्सच्या कक्षेत

· कॉर्पोरेट बफरची सुविधा

· नेटवर्क हॉस्पिटल्सचं देशभरात जाळ

कर्मचाऱ्याला शेअर, स्टॉक ऑप्शन

कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा होण्याच्या हेतूने कर्मचाऱ्यांना शेअर धारक म्हणून समाविष्ट करण्याचा विचार केला जात आहे. टाटा समूहाच्या अन्य कंपन्यांसाठी उपलब्ध असलेला ESOP चा पर्याय एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. वर्ष 2018 मध्ये टाटा कंपनीने सर्वात पहिल्यांदा आपल्या कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शनची सुविधा उपलब्ध केली होती.

हे सुद्धा वाचा

एअर इंडियाचे नवे ‘कॅप्टन’

एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कँपबेल विल्सन यांची वर्णी लागली आहे. ऐतिहासिक विमान कंपनीचं नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी असल्याचं मत विल्सन यांनी व्यक्त केलं होतं. टाटा समुहाने 27 जानेवारी पासून केंद्र सरकारकडून एअर इंडियाची सूत्रे सांभाळली आहे. एअर इंडियावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर होता. टाटा समूहानं विक्री बोली लावून पुन्हा सूत्रे हाती घेतली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें