Good News: ‘या’ बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात वाढ, वार्षिक 6 % व्याज मिळणार

आता एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6% व्याज मिळेल. सध्या एअरटेल पेमेंट्स बँकेचे 5.5 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. Airtel Payments Bank

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:33 PM, 4 May 2021
Good News: 'या' बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात वाढ, वार्षिक 6 % व्याज मिळणार

नवी दिल्ली: कोरोना साथीच्या काळात एअरटेल पेमेंट्स बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. एअरटेल पेमेंट्स बँकेने (Airtel Payments Bank ) आपल्या बचत खात्यावरील ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केलीय. आता एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6% व्याज मिळेल. सध्या एअरटेल पेमेंट्स बँकेचे 5.5 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. (Airtel Payments Bank Hike 6 Percent Interest Rate On Deposits Over 1 Lakh Rupees)

जाणून घ्या बँक काय म्हणाली?

एअरटेल पेमेंट्स बँकेचे म्हणणे आहे की, नवीन आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेमेंट्स बँकेच्या बचत खात्याची दैनंदिन मर्यादा दोन लाख रुपये करण्यात आलीय. एअरटेल पेमेंट्स बँकेने प्रथम ती लागू केली. एअरटेलचे 5.5 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. त्याचबरोबर एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील वार्षिक व्याज अडीच टक्के आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेचे 5 लाख बँकिंग पॉईंट आहेत. बँक शहरी डिजिटल आणि ग्रामीण दोन्ही अंतर्गत ग्राहकांसाठी बँकिंग सेवा प्रदान करते.

याचा ग्राहकांना मोठा फायदा

एअरटेल पेमेंट्स बँकेचे सीईओ अनुब्रता बिस्वास म्हणाले की, आरबीआयकडून बचत ठेवीची मर्यादा वाढविणे पेमेंट्स बँकेसाठी एक मोठे पाऊल आहे. आमच्याकडे 5 लाखांहून अधिक बँकिंग पॉईंट्स आणि सुरक्षा डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे वापरकर्ते सुरक्षित पद्धतीने डिजिटल व्यवहार करू शकतात. शहरी डिजिटल आणि ग्रामीण ग्राहकांच्या दृष्टीने एअरटेल पेमेंट्स बँक बाजारपेठेत अग्रणी आहे. एअरटेल थँक्स अॅपवरून व्हिडीओ कॉलद्वारे एअरटेल पेमेंट्स बँकेत खाते उघडता येते. बँक Rewards123 नावाचे डिजिटल सेव्हिंग खाते ऑफर करते, जे डिजिटल व्यवहार करणार्‍या ग्राहकांना महत्त्वाची सेवा पुरवते.

संबंधित बातम्या

टाटाची जबरदस्त योजना, नियमित कमाईची संधी अन् पैशाच्या गुंतवणुकीत दुप्पट फायदा

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वेतननिश्चितीबाबत मोठा निर्णय

Airtel Payments Bank Hike 6 Percent Interest Rate On Deposits Over 1 Lakh Rupees