पेन्शनधारकांना मोठा दिलासा! हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ

हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत पुढील वर्षी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली. (Life Certificate Central Government)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:20 AM, 27 Nov 2020

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या संकटात (Coronavirus Crisis) केंद्र सरकारने पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने निवृत्तीवेतनधारकांकडून हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करण्याची मुदत पुढील वर्षी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविली आहे. (Alert Pensioners Central Government Extends Date For Submitting Life Certificate)

तत्पूर्वी सरकारने 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत वाढविली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारनं निवृत्तीधारकांना अंतिम मुदत वाढवून दिल्यामुळे 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांना हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करता येणार आहे. या कालावधीत निवृत्तीवेतनधारकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पेन्शन मिळणे सुरू राहील.

पेन्शन आणि पेंशनर्स कल्याण विभाग हा केंद्र सरकारच्या नागरी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्तीच्या फायद्यांबाबत धोरण बनविणारा नोडल विभाग आहे. या विभागाने आपल्या ट्विटर हँडलवर हयातीचा दाखला सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यासाठी परिपत्रक काढले होते. (Alert Pensioners Central Government Extends Date For Submitting Life Certificate)

आपण पोस्ट ऑफिसमध्ये देखील जमा करू शकता हयातीचा दाखला

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) घरबसल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे. ईपीएस पेन्शनधारक आता नाममात्र फी भरल्यानंतर डीएलसी सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन विनंत्या अर्ज सादर करू शकतात. जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाऊन डीएलसी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकेल.

केंद्र सरकारच्या प्रत्येक निवृत्ती वेतनधारकाला नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करावे लागणार आहे. असे निदर्शनास आले आहे की, मोठ्या संख्येने केंद्र सरकारचे पेन्शनर्स स्वत: बँक शाखांमध्ये जातात. लेखा नियंत्रक कार्यालयाशी सल्लामसलत केल्यानंतर आता हयातीचा दाखला सादर करण्यासाठी सध्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे उद्दिष्ट म्हणजे बँकेच्या शाखांमध्ये गर्दी टाळणे, ज्येष्ठ लोकांद्वारे एलसीएसची उपस्थिती टाळणे, सामाजिक अंतर राखताना कोरोनायरसचा प्रसार रोखणे, असा आहे.

(Alert Pensioners Central Government Extends Date For Submitting Life Certificate)

संबंधित बातम्या

Small Savings Schemes: ‘या’ पाच सरकारी योजनांमध्ये जबरदस्त फायदा; मिळणार दुप्पट नफा

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?, स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी 5 सोप्या टिप्स