नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम करा, अमेझॉनकडून सुवर्ण संधी

नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम करा, अमेझॉनकडून सुवर्ण संधी
या सर्व गोष्टींची असेल आवश्यकता - डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील पासिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुंबई : ग्राहकाने ऑर्डर केलेली वस्तू लवकरात लवकर त्याच्या घरी पोहचावी यासाठी अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नवीन प्रस्ताव दिला आहे. नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम करा, असा प्रस्ताव कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला आहे. यामध्ये कंपनी नोकरी सोडून अमेझॉनसाठी डिलिव्हरी उद्योग सुरु करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदतही करणार आहे.

अमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी डिलिव्हरी कालावधी दोन दिवसांचा असतो, पण आता त्यामध्ये घट करत तो एक दिवसांचा करण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. कंपनीला अपेक्षा आहे की, ग्राहकांच्या दरवाजापर्यंत कमी कालावधीत आम्ही वस्तू पोहचवण्यासाठी यशस्वी ठरु शकतो.

अमेझॉनने म्हटलं आहे की, जे कर्माचारी नोकरी सोडून या प्रोग्राममध्ये सहभागी होतील. त्यांच्या स्टार्टअपसाठी कंपनी 10 हजार डॉलरपर्यंत खर्च करणार आहे. तसेच अशा कर्माचाऱ्यांना कंपनी तीन महिन्याची सॅलरीही दिली जाणार आहे. ही ऑफर पार्ट टाईम आणि फुल टाईम काम करणाऱ्या तसेच वेअरहाऊस कर्मचारी, ऑर्डर पॅक करणारे आणि पाठवणाऱ्या कर्माचाऱ्यांसाठी आहे. होल वर्क फूडचे कर्माचारी या ऑफरचा लाभ घेऊ शकत नाही.

या डिलिव्हरी उद्योगात किती कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल याबद्दल कंपनीने अजून काही सांगितलेलं नाही. गेल्यावर्षी कंपनीने म्हटलं होते की, स्वतंत्र डिलिव्हरी उद्योग सुरु करण्यासाठी अमेझॉनला अर्ज करु शकता. कंपनीच्या माहितीनुसार, यूपीएस, पोस्ट ऑफिस किंवा इतर मालवाहतूकावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:चा उद्योग कंपनी सुरु करण्यासाठी ईच्छुक आहे.

“गेल्यावर्षी जून महिन्यात हा उपक्रम सुरु केल्यानंतर 200 अमेझॉन डिलिव्हरी उद्योग तयार झाले आहेत”, असं अमेझॉनचे ग्लोबल डिलिव्हरी सर्व्हिसेसचे व्हाईस प्रेसिडेंट जॉन फेल्टने म्हणाले.

Published On - 9:18 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI