Amazon 10 लाख कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार, ‘यांनाही’ मिळणार लाभ

अ‍ॅमेझॉनचे उद्दिष्ट हे आहे की, लोकांना शक्य तितक्या लवकरात लवकर कोरोना लस (vaccination) मिळू शकेल आणि प्रत्येकजण सुरक्षित होईल. Amazon India To Cover Covid 19 Vaccination

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:58 PM, 12 Apr 2021
Amazon 10 लाख कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार, 'यांनाही' मिळणार लाभ
Amazon Prime Day Sale

नवी दिल्लीः देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियाने (amazon india) कोरोनाविरुद्ध लढ्यात लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलीय. कंपनीने 10 लाख लोकांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार असल्याचे म्हटले आहे. यात कर्मचार्‍यांसह कंपनीच्या नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनचे उद्दिष्ट हे आहे की, लोकांना शक्य तितक्या लवकरात लवकर कोरोना लस (vaccination) मिळू शकेल आणि प्रत्येकजण सुरक्षित होईल. (amazon india to cover covid 19 vaccination cost for 10 lakh people)

कोरोना लसीकरणाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार

यासंदर्भात कंपनीने एक निवेदनही जारी केलेय. कोरोना लसीकरणाचा लाभ फ्लेक्स ड्रायव्हर्स, स्टोअर पार्टनर, ट्रॅकिंग पार्टनर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्व अवलंबितांना देण्यात येईल, असंही निवेदनात म्हटलंय. “कोविड 19 लसी भारतात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना उपलब्ध झाल्यानंतर अॅमेझॉन इंडिया आपल्या कर्मचार्‍यांना विक्रेते आणि ग्राहकांना लसी देण्यास प्रोत्साहित करेल.” ज्याद्वारे ते त्यांचे कुटुंब आणि त्यांचे समुदाय यांचे संरक्षण करू शकतात.”

COVID-19 उपचारापासून ते रुग्णालयाच्या शोध आणि चाचण्यांच्या व्याप्तीपर्यंतचा खर्च कंपनी देणार

अॅमेझॉनने कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आणि सहयोगींसाठी एक व्यापक समर्थन प्रणाली स्थापित केलीय. ज्यामध्ये त्यांना प्रत्येक प्रकारे मदत केली जाईल. कंपनीच्या वतीने COVID-19 उपचारापासून ते रुग्णालयाच्या शोध आणि चाचण्यांच्या व्याप्तीपर्यंतचा खर्च देण्यात येणार आहे.

जागतिक पातळीवर अडीच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “अॅमेझॉनने आपल्या टीमला विशेष बोनस आणि प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षी जागतिक पातळीवर अडीच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. त्याच वेळी कंपनीने कोरोनाशी लढण्यासाठी सुमारे 11.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलीय. ” Amazon India To Cover Covid 19 Vaccination Cost For 10 Lakh People

संबंधित बातम्या

LIC च्या ‘या’ योजनेत 15 लाख जमा करा; वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त पेन्शन मिळणार!

Online Transaction करणार्‍यांसाठी मोठी बातमी! रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद

Amazon India To Cover Covid 19 Vaccination Cost For 10 Lakh People