कंपनीने ‘मेक ऍमेझॉन पे’ (Make Amazon Pay) या जागतिक प्रचार मोहिमेच्या दरम्यान ही घोषणा केली. Amazon Offers Special Recognition Bonus Of Rs 65300 To Employees In India
नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) ही भारतातील आपल्या कर्मचार्यांना 6,300 रुपयांपर्यंत स्पेशल रिकग्निशन बोनस (Special Recognition Bonus) देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हा बोनस परदेशात त्यांच्या कर्मचार्यांना दिलेल्या बोनसच्या अनुरुपच असणार आहे. कंपनीने ब्लॉगपोस्टमध्ये याची घोषणा केली. कंपनीने ‘मेक अॅमेझॉन पे’ (Make Amazon Pay) या जागतिक प्रचार मोहिमेच्या दरम्यान ही घोषणा केली. (Amazon Offers Special Recognition Bonus Of Rs 65300 To Employees In India)
6300 रुपयांपर्यंत मिळणार विशेष बोनस
कंपनीच्या ब्लॉगपोस्टमध्ये अॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष (Global operations) म्हणाले की, कंपनीच्या भारतीय कामकाजामध्ये पूर्णवेळ काम करणा-या कर्मचार्यांना 6,300 रुपयांपर्यंतचा खास बोनस आणि अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचार्यांना 3,150 रुपयांपर्यंतचा बोनस दिला जाणार आहे.
हा बोनस 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर रोजी कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या पात्र कर्मचा-यांना देण्यात येणार आहे. आम्ही आमच्या टीमचे आभार मानतो, जे लोकांच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्ही नुकताच भारतात सणासुदीचा काळ पार केला असल्याने कंपनीला आपल्या टीमला रिकग्निशन बोनस देऊन अभिनंदन करायचे आहे.
Delivery notifications help you keep track of your order progress. Head to your notification settings in the Amazon App to turn them on: https://t.co/UoMfYsGnAz pic.twitter.com/RnO0ubnDod
— Amazon India (@amazonIN) November 30, 2020
बोनस-इन्सेंटिव्हसाठी 185000 कोटी रुपये खर्च
केवळ चालू तिमाहीत अॅमेझॉन त्याच्या फ्रंट-लाइन एव्हर्ली वर्कफोर्ससाठी 75 कोटी अतिरिक्त पगाराच्या स्वरूपातील रकमेची गुंतवणूक करीत आहेत. हे त्याच्या नियमित पगारावर अवलंबून आहे. 2020 मध्ये कंपनीच्या विशेष बोनस आणि प्रोत्साहनपर कंपनीचा जागतिक खर्च 18,500 कोटी रुपये (2.5 अब्ज डॉलर्स) पर्यंत गेला आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या 50 कोटी डॉलरच्या थँक्यू बोनसचा देखील समावेश आहे.
संबंधित बातम्या
आजपासून 4 महत्त्वाचे नियम बदलले; थेट आपल्या खिशावर परिणाम
Bank Holidays in December 2020 | बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद