अमेरिकेने भारताकडून 15 लाख कोटींचे घेतले कर्ज; प्रत्येक अमेरिकन व्यक्तीवर 60 लाखांचे कर्ज

एका अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा बोजा 29 ट्रिलियन डॉलर (29 लाख करोड डॉलर) पर्यंत पोहोचलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:59 PM, 27 Feb 2021
अमेरिकेने भारताकडून 15 लाख कोटींचे घेतले कर्ज; प्रत्येक अमेरिकन व्यक्तीवर 60 लाखांचे कर्ज
narendra modi joe biden

नवी दिल्लीः कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालाय. अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसलाय. अमेरिकन अर्थव्यवस्था भारतापेक्षा 7 पट मोठी आहे आणि तिचा आवाका 21 ट्रिलियन डॉलर एवढा आहे. एका अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा बोजा 29 ट्रिलियन डॉलर (29 लाख करोड डॉलर) पर्यंत पोहोचलाय. भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा हे दहा पट जास्त आहे. अमेरिकेने भारताकडून 216 अब्ज डॉलर्स (सुमारे 15 लाख कोटी) कर्जही घेतले आहे. 2020 मध्ये अमेरिकेवर राष्ट्रीय कर्ज 23.4 ट्रिलियन डॉलर्स होते. यानुसार प्रत्येक अमेरिकेचे 72309 डॉलर्स (52 लाखांहून अधिक) चे कर्ज होते. (America Owes 216 Billion Dollar India Every American Under 60 Lakhs Loan)

अमेरिकेने चीन आणि जपान घेतले 1-1 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज

या अहवालानंतर प्रत्येक अमेरिकन व्यक्तीवर सध्या सुमारे 84000 डॉलर्स (60 लाख रुपयांपेक्षा जास्त) चे कर्ज आहे. अमेरिकन कॉंग्रेस Alex Mooney म्हणाले की, अमेरिकेने चीन आणि जपानकडून जास्तीत जास्त कर्ज घेतलेय, जे त्यांचे मित्र देशही नाहीत. मूनी म्हणाले की, चीन ही अमेरिकेसाठी नेहमीच स्पर्धात्मक देश राहिलाय. अमेरिकेने चीन आणि जपान या देशांकडून 1-1 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. कर्जाचा वाढता बोजा लक्षात घेऊन कॉंग्रेस मूनी यांनी 1.9 ट्रिलियन डॉलरच्या नव्या मदत पॅकेजला विरोध केलाय. ब्राझीलवरही अमेरिकेचे 258 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. 2000 मध्ये अमेरिकेवर 6 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते, जे ओबामा सरकारच्या काळात दुप्पट होते. america owes 216 billion dollar india every american under 60 lakhs loan

2050 पर्यंत 104 ट्रिलियन डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज

कॉंग्रेस मूनी म्हणाले की, ओबामा आठ वर्षे देशाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कारकिर्दीत कर्जाचा बोजा खूप मोठा होता. नवीन मदत पॅकेज मंजूर होण्यापूर्वी कॉंग्रेस मूनी यांनी अन्य खासदारांनीही याचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, Congressional Budget Office अंदाजानुसार, 2050 पर्यंत अमेरिकेला आणखी 104 ट्रिलियन डॉलर्स कर्ज मिळेल. ही एक अतिशय भयावह आकडेवारी आहे.

भारत 12 लाख कोटी बाजारपेठेतून कर्ज घेणार

भारताबद्दल बोलायचे झाल्यास मोदी सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पात बाजारातून 12 लाख कोटी कर्ज घेण्याचे ठरविले आहे. सध्या सरकारवर एकूण 147 लाख कोटी कर्ज आहे. नवीन आर्थिक वर्षात कर्ज घेण्याच्या घोषणेनंतर हा आकडा 159 लाख कोटी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये 7.3 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 पर्यंत सरकारने वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5 टक्के राहील, असा अंदाज लावलाय. हा तूट अंदाज पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2021-22 च्या जीडीपीच्या 6.8 टक्के ठेवण्यात आलाय.

संबंधित बातम्या

SBI ची विशेष योजना सुरू; 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा फायदा

Gold Price Outlook | मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

america owes 216 billion dollar india every american under 60 lakhs loan