Yahoo चा मोठा निर्णय; चीनमधून गाशा गुंडाळणार

भारतात लोकं बॉयकॉट चीनचा नारा देत आहेत, तर चायनीज कंपन्या भारतात सलग मोबाईल विकण्याचे नवीन रेकॉर्ड करत आहेत (Chinese Company sell in india). सरकार ते सामान्य माणूस बॉयकॉट चीनचा नारा देत आहे. पण त्याचा भारतात किती फरक पडला हे चीनी कंपनीच्या विक्रीवरुन स्पष्ट झाले आहे.

Yahoo चा मोठा निर्णय; चीनमधून गाशा गुंडाळणार
याहू
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:52 AM

नवी दिल्ली: अमेरिकेच्याYahoo Inc (Yahoo) कंपनीने चीनमधून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. चीनमध्ये व्यावसायिक आणि कायदेशीर आव्हाने वाढत असल्याने हा निर्णय घेत असल्याचे ‘याहू’ने सांगितले. चिनी अधिकारी देशात इंटरनेट सेन्सॉरशिपची कडक अंमलबजावणी करतात. चीनमध्ये कार्यरत कंपन्यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि अयोग्य सामग्री आणि शब्द अवरोधित करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोशल मीडियासह अनेक माध्यमांची कोंडी झाली आहे.

चीनमधील वाढता व्यवसाय आणि कायदेशीर आव्हानांमुळे, चीनच्या मुख्य भूभागावर याहूच्या सर्व सेवा यापुढे 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार नाहीत, असे याहू कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. चीनमधील वापरकर्त्यांना प्रदान केलेल्या सेवा 1 नोव्हेंबरपासून थांबवण्यात आल्या आहेत. चीनच्या स्थानिक माध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही वापरकर्त्यांच्या हक्कांसाठी आणि विनामूल्य आणि मुक्त इंटरनेटसाठी वचनबद्ध आहोत, असेही ‘याहू’कडून सांगण्यात आले.

‘याहू’ने टोकाचे पाऊल का उचलले?

चीनमधील कायद्यानुसार देशात कार्यरत कंपन्यांनी अधिकार्‍यांना मागणीनुसार डेटा प्रदान करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पाश्चात्य कंपन्यांना तेथे काम करणे कठीण होते. या कंपन्यांवर सरकारचा दबाव असतो. अलीकडच्या आठवड्यात चीनमध्ये आपले कामकाज कमी करणारी Yahoo ही दुसरी मोठी अमेरिकी तंत्रज्ञान कंपनी आहे. गेल्या महिन्यात, मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘लिंक्डइन’नेही चीनमधून काढता पाय घेतला होता.

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ

भारतात लोकं बॉयकॉट चीनचा नारा देत आहेत, तर चायनीज कंपन्या भारतात सलग मोबाईल विकण्याचे नवीन रेकॉर्ड करत आहेत (Chinese Company sell in india). सरकार ते सामान्य माणूस बॉयकॉट चीनचा नारा देत आहे. पण त्याचा भारतात किती फरक पडला हे चीनी कंपनीच्या विक्रीवरुन स्पष्ट झाले आहे. 2018 मध्ये एमआयने (Mi India) भारतात 50 लाखांपेक्षा अधिक स्मार्ट टीव्हीची विक्री केली आहे, असं एमआयने सांगितले.

एमआय टीव्हीमध्ये पॅचवॉल लावण्यात आला आहे. भारतीय मार्केटवर लक्ष केंद्रित करुन हा पॅचवॉल तयार केला आहे. पॅचवॉलच्या मदतीने भारतीय ग्राहक 23 कंटेंट पार्टनर्सचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम व्हिडीओ इतर आहेत.

संबंधित बातम्या:

अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत! विकासदर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 10% किंवा त्याहून अधिक राहणार : NITI आयोग

DA मध्ये पुन्हा वाढ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांपर्यंत फायदा; जाणून घ्या

Stock Market Holidays: दिवाळीनिमित्त या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार बंद, वाचा मुहूर्त ट्रेडिंगबद्दल सविस्तर!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.