नवी दिल्लीः कोरोना संकटामध्ये प्रत्येक क्षेत्रात सुधारणा झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे वाहन क्षेत्रात (Auto Sector) चांगली सुधारणा झालेली असून, नवीन नोकऱ्या (New Jobs) उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर 2020मध्ये वाहन क्षेत्राने 29 टक्के अधिक नोकऱ्या (Recruitment) दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या आधी या क्षेत्रात एवढी सुधारणा झालेली नव्हती. रोजगाराशी संबंधित ऑनलाईन सेवा देणारे पोर्टल नोकरी डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार वाहन क्षेत्रातील रोजगाराची (Employment) परिस्थिती दर महिन्याला सुधारत आहे. (Auto Sector Given Job To 29 Percent In September)
2020 पासून सकारात्मक ट्रेंड
पोर्टलनुसार, जून 2020पासून लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ऑटो सेक्टरमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. कोरोना संकटाच्या आधी व सध्याच्या वाहन क्षेत्राच्या कामगिरीची तुलना करताना ही सुधारणा स्पष्टपणे दिसून येते. कोरोना संकटाच्या आधीच्या परिस्थितीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये अजूनही 25 टक्क्यांनी खाली आहे. त्याच वेळी, एप्रिल 2020 मध्ये कोरोना संकटाच्या आधीच्या पातळीपेक्षा हे 80 टक्के खाली होते. गेल्या काही महिन्यांत कंपन्यांमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे.
या पदांवर नेमणुका होत आहेत
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑटो सेक्टरमध्ये प्रोडक्शन मॅनेजर ते इंडस्ट्रियल इंजिनीअर आणि सेल्स डेव्हलपमेंट मॅनेजर ते सर्व्हिस मेन्टेनन्स इंजिनिअरपर्यंत भरती करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त डिझाईन अभियंता व लेखापाल यांची नेमणूक या काळात करण्यात आली आहे. प्रोजेक्ट मॅनेजर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 57%, सर्व्हिस मेन्टेनन्स इंजिनिअरमध्ये 46% आणि प्रॉडक्शन मॅनेजरच्या भूमिकांमध्ये 22% वार्षिक-वर्षाची वाढ झाली आहे.
या कंपन्यांना आहे लोकांची गरज
प्रॉडक्शन मॅनेजर, क्वालिटी इंजिनिअर आणि सेल्स जॉबसंदर्भात पोर्टलवर सर्वाधिक शोध घेतला जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, वाहन क्षेत्रातील 52 टक्के रोजगार पुणे, दिल्ली, चेन्नई आणि बंगलुरुमध्ये आहेत. नोकरीत या चार शहरांचे योगदान पुण्यात 22 टक्के, दिल्लीत 14 टक्के, चेन्नईत 9 टक्के आणि बंगळुरूमध्ये 7 टक्के होते. याशिवाय सुझुकी, कार 24, एक्झाइड, रॉयल एनफील्ड, एल अँड टी आणि टीव्हीएस यांसारख्या कंपन्या सध्या उमेदवार शोधत आहेत.
संबंधित महत्त्वाच्या बातम्या
TVS Jupiter वर जबरदस्त ऑफर्स, झिरो फायनान्ससह कॅशबॅकची सुविधा