भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत; एप्रिलमध्ये बेरोजगारी वाढली, नोकऱ्यांवर गंडांतर?

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अहवालानुसार 11 एप्रिल 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण (Unemployment Rate) 8.6 टक्क्यांवर पोहोचले आहे, दोन आठवड्यांपूर्वी ते 6.7 टक्के होते. Bad signs for Indian economy

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:47 PM, 12 Apr 2021
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत; एप्रिलमध्ये बेरोजगारी वाढली, नोकऱ्यांवर गंडांतर?
Bad signs for Indian economy

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) आणि सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे कोरोना विषाणूमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, दुसरीकडे किरकोळ महागाई (Retail Inflation) पुन्हा वाढू लागली आहे. या व्यतिरिक्त औद्योगिक उत्पादनात घट (IIP) देखील नोंदली गेली आहे. या सर्वांच्या दरम्यान आता नोकरीबाबत निराशाजनक अहवाल समोर आला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अहवालानुसार 11 एप्रिल 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण (Unemployment Rate) 8.6 टक्क्यांवर पोहोचले आहे, दोन आठवड्यांपूर्वी ते 6.7 टक्के होते. (Bad signs for Indian economy; Unemployment rises in April, job turmoil)

शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त

कोविड-19 च्या प्रकरणात वाढ झाल्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वाढलीय, त्याचबरोबर नोकरकपातीचा धोकाही वाढला आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार पुन्हा लोकांमध्ये निराशा वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले. मग कोट्यवधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आणि कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला. आता कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा नोकर्‍या धोक्यात आल्यात. वाढीव बेरोजगारीच्या दराच्या आधारे असे म्हणता येईल की, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एप्रिलमध्ये शहरी भागातील बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचला, तर मार्चमध्ये हा दर 7.84 टक्के होता. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर अजूनही 6.7 टक्के आहे.

प्रवासी मजूर मायदेशी परतायत

कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये बहुतेक स्थलांतरित कामगार आपल्या घरी परतले होते. लॉकडाऊन उठवल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आल्याचे दिसून आले, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून कोरोना प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत मजूर नोकरी सोडून लॉकडाऊनच्या आधीच त्यांच्या घरी पोहोचू इच्छित आहेत. या सर्वांमध्ये चांगली बातमी म्हणजे ई-कॉमर्स कंपन्या नवीन नोकऱ्या देण्याची तयारी करीत आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता पुन्हा ई-कॉमर्स व्यवसायात तेजीची आशा आहे. अशा परिस्थितीत सर्व ई-कॉमर्स कंपन्या कठीण काळात लोकांना प्रत्येक आवश्यक वस्तू देण्याची तयारी करत आहेत.

संबंधित बातम्या

Yes Bank ला आता 25 कोटी रुपयांचा दंड; कोट्यवधी ग्राहकांचे काय?

कोरोनानंतरही TCS ला मोठा फायदा, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीच्या नफ्यात 15% वाढ

Bad signs for Indian economy; Unemployment rises in April, job turmoil?