Alerts ! रात्री 12 वाजल्यानंतर 14 तास बँकांची ही सेवा बंद असणार; RBI ची माहिती

आरटीजीएस म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS-Real-Time Gross Settlement) ही वीकेंड लॉकडाऊनमुळे बंद होणार आहे. NEFT RTGS  IMPS Facility Unavailable 14 Hours

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:41 PM, 17 Apr 2021
Alerts ! रात्री 12 वाजल्यानंतर 14 तास बँकांची ही सेवा बंद असणार; RBI ची माहिती
punjab national bank nps account

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालीय. म्हणूनच लोक घरी बसून नेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप्सद्वारे पैशांची देवाणघेवाण करीत आहेत. त्याच वेळी आपल्या बँकेची एक विशेष सेवा आरटीजीएस म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS-Real-Time Gross Settlement) ही वीकेंड लॉकडाऊनमुळे बंद होणार आहे. चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया… (Bank Fund Transfer NEFT RTGS  IMPS Facility Unavailable 14 Hours 18 April 2021)

जाणून घ्या आरटीजीएस म्हणजे काय आणि त्याचा वापर कोण करते?

पैसे हस्तांतरणासाठी आरटीजीएसचा वापर केला जातो. त्याचे पूर्ण नाव रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे. आरटीजीएस फंड ट्रान्सफरची प्रक्रिया आहे, ज्यात व्यवहार वेगाने होतात. या प्रणालीद्वारे आपण एका बँक खात्यातून दुसर्‍या बँकेत सहजपणे पैसे हस्तांतरित करू शकता. आरटीजीएसमध्ये पैसे त्वरित हस्तांतरित केले जातात. त्यास पैसे पाठविण्याची मर्यादा आहे. याअंतर्गत तुम्हाला किमान दोन लाख रुपयांचा व्यवहार करण्याची आवश्यकता असेल.
आरटीजीएस 26 मार्च 2004 पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी फक्त चार बँका त्यातून पेमेंटची सुविधा देत होत्या. सामान्य ग्राहक हे क्वचितच ती वापरतात. या सेवेचा व्यावसायिक अधिक वापर करतात. आरटीजीएसमध्ये निधी हस्तांतरणासाठी किमान मर्यादा दोन लाख रुपये आहे. मोठ्या निधी हस्तांतरणासाठी आरटीजीएसचा वापर केला जातो.

आरबीआय काय म्हणते?

जर आपण दररोज आरटीजीएस (RTGS) च्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून आरटीजीएस सेवा 14 तास उपलब्ध होणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले.

आरटीजीएस सेवा का बंद केली जातेय?

तांत्रिक सुधारणांसाठी ही सेवा काही तासांसाठी बंद केली जात आहे, असे आरबीआयचे म्हणणे आहे. 17 एप्रिल 2021 रोजी आरटीजीएस प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ‘डिजास्टर रिकवरी’ची वेळ सुधारण्यासाठी हे काम पूर्ण झाल्यानंतर आरटीजीएस तांत्रिकदृष्ट्या सुधारित असेल, त्यामुळे काही तास या सेवेवर परिणाम होईल.

आरबीआयने काही दिवसांपूर्वी आरटीजीएस नियम बदलले

आरटीजीएसचा वापर पूर्वी बँकेच्या वेळेशी जोडला गेला होता. बँक उघडी असेपर्यंत ही सेवा वापरली जाऊ शकत होती. आता ती 24 तास सात उपलब्ध करून देण्यात आलीय.

आयएमपीएस पैसे हस्तांतरित करण्याचा एक सोपा मार्ग?

होय, आरटीजीएस व्यतिरिक्त बँका आयएमपीएस आणि एनईएफटी सेवा देखील प्रदान करतात. प्रथम आयएमपीएसबद्दल जाणून घेऊया. आयएमपीएस ही एक मोबाईल पेमेंट सेवा आहे. जर सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास कोणत्याही खातेदारास कधीही पैसे पाठविले जाऊ शकतात. अर्थात आयएमपीएसद्वारे 24/7 पैसे पाठवता येतात. याद्वारे केवळ 1 रुपयांमधून 2 लाख रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरण करता येणार आहेत. बर्‍याच बँकांमध्ये आयएमपीएसकडून पैसे हस्तांतरित करण्याची फीदेखील असते.

एनईएफटीला नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असे म्हणतात

एनईएफटीला नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असे म्हणतात. याद्वारे आपण 24 तासांत कधीही पैसे पाठवू शकता, परंतु यात पैसे हस्तांतरण तात्काळ होत नाही. पैसे हस्तांतरित करण्यासाठी थोडा वेळ लागतो. एनईएफटी स्लॉट सिस्टमवर कार्य करते आणि दर अर्ध्या तासाला एक स्लॉट असतो, ज्यामध्ये अर्ध्या तासात केलेल्या बदल्या एकाच वेळी पूर्ण केल्या जातात. यातून पैसे पाठविण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे आणि आपण कधीही सहज पैसे पाठवू शकता. पूर्वी एनईएफटीकडून पैसे केवळ बँकेच्या कामकाजाच्या दिवशीच पाठवत होते, पण आता कधीही पैसे पाठवता येतील. Bank Fund Transfer NEFT RTGS  IMPS Facility Unavailable 14 Hours 18 April 2021

संबंधित बातम्या

Online Transaction करणार्‍यांसाठी मोठी बातमी! रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या नाईट अलाऊन्सबाबत महत्त्वाची बातमी, 1 जुलैपासून मोठा फायदा

Bank Fund Transfer NEFT RTGS  IMPS Facility Unavailable 14 Hours 18 April 2021